ETV Bharat / bharat

पंतप्रधान मोदी रविवारी शंकराचार्यांच्या गुंफेत ध्यान-योग साधना करण्याची शक्यता - kedarnath

पंतप्रधान मोदींनी सक्रिय राजकारणात येण्याआधीही केदारनाथ धाम येथील आद्य गुरु शंकराचार्यांची समाधी असलेल्या या प्राचीन गुंफेत ध्यान-साधना केली आहे. या कारणाने त्यांना या स्थानाविषयी विशेष आस्था असल्याचे सांगण्यात येत आहे.

शंकराचार्याची गुंफा
author img

By

Published : May 18, 2019, 10:59 AM IST

डेहराडून - पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केदारनाथ मंदिरात आगमन झाले आहे. मंदिरात दर्शन आणि पूजनानंतर पंतप्रधान मोदी केदारनाथ धाम येथील आद्य शंकराचार्यांच्या समाधी (प्राचीन गुफा) स्थानावर ध्यान-साधना करण्याची शक्यता आहे. हे स्थान मोदींनी स्वतः देखरेखीखाली बांधून घेतले आहे. त्यांच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'मध्येही हे स्थान समाविष्ट आहे.

२०१३ मध्ये केदारनाथमध्ये आलेल्या भीषण नैसर्गिक आपत्तीमध्ये मंदिर परिसरासह आद्य शंकराचार्यांच्या या स्थानाची पूर्णपणे पडझड झाली होती. यानंतर या समाधीस्थळाची दुरुस्ती सुरू होती. मागील वर्षी पंतप्रधानांनी केदारनाथला पोहोचल्यानंतर आद्य शंकराचार्यांच्या समाधीला भव्यदिव्य रूप देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार, मोदींच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये केदारनाथ पुनर्निर्माण योजनेमध्ये शंकराचार्यांच्या समाधीस्थळालाही भव्य रूप देण्यात आले आहे. आता येथे एकाच वेळी एक हजार भाविक आद्य शंकराचार्यांच्या समाधीचे दर्शन घेऊ शकतात.

केदारनाथ मंदिरामागे साधारण ४०० मीटर अंतरावर मंदाकिनी नदीच्या पलीकडे चोराबाडी ताल याच्या खालील क्षेत्रात एका गुंफेमध्ये या स्थानाची निर्मिती करण्यात आली आहे. ही समाधी पहाडी शैलीमध्ये तयार करण्यात आली आहे. गुंफेत वीज, पाणी, शौचालय आदी सर्व सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. येथे साधू-संत किंवा इतर यात्रेकरूही येथे थांबतात. गुंफेत राहणाऱ्या यात्रेकरूंसाठी ९९० रुपये भाडे ठेवण्यात आले आहे. यात्रेकरू योग-साधनेसह विश्रांतीही घेऊ शकतात.

मागील वर्षी केदारनाथ येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केदारपुरी येथून २ किलोमीटर अलीकडे केदारनाथ गुंफा तयार करण्यास सांगितले होते. ती आता तयार झाली आहे. या गुंफेची लांबी ५ मीटर आणि रुंदी ३ मीटर आहे. केदारनाथ येथे योग-साधनेसाठी ही गुंफा तयार करण्यात आल्यानंतर आता येथे ऑनलाइन बुकिंगसाठीही व्यवस्था करण्यात आली आहे.

पंतप्रधान मोदींनी सक्रिय राजकारणात येण्याआधीही केदारनाथ धाम येथील आद्य गुरु शंकराचार्यांची समाधी असलेल्या या प्राचीन गुंफेत ध्यान-साधना केली आहे. या कारणाने त्यांना या स्थानाविषयी विशेष आस्था असल्याचे सांगण्यात येत आहे.

१९९८ सालापासून २००१ पर्यंत उत्तराखंड (यूपी)चे भाजप संघटन प्रभारी असताना पंतप्रधान मोदी त्यांच्या धार्मिक आस्थेमुळे केदारनाथ धामाच्या दर्शनासह जगद्विख्यात अध्यात्मिक गुरु आद्य शंकराचार्य यांच्या समाधी स्थानी साधना करत असत. २००१ नंतर पंतप्रधान मोदी राजकारणात पूर्ण सक्रिय होऊन त्यामध्येच व्यग्र झाले. त्यानंतर ते ४ वेळा गुजरातचे मुख्यमंत्री बनले. त्यानंतर २०१४ मध्ये देशाचे पंतप्रधान बनले.

Intro:Body:

uttarakhand pm modi will meditate in kedarnath

uttarakhand, pm modi, meditate, kedarnath

-------------

पंतप्रधान मोदी रविवारी शंकराचार्यांच्या गुंफेत ध्यान-योग साधना करण्याची शक्यता

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.