ETV Bharat / bharat

कारगील युद्धात देशाच्या ५२६ तर, उत्तराखंडच्या ७५ जवानांनी दिली होती प्राणांची आहुती - india vs pakistan

'ऑपरेशन विजय' यशस्वी करून दाखवणाऱ्या हुतात्मा जवानांमध्ये उत्तराखंड राज्यातील तब्बल ७५ जवान शहीद झाले होते. आजही राज्यातील नागरिक हळहळ व्यक्त करतात.

विजय दिवस
author img

By

Published : Jul 19, 2019, 11:28 PM IST

डेहराडून - उत्तराखंड राज्याची देवभूमी ही ओळख माहीत आहे. मात्र, या राज्याची एवढीच ओळख नसून शहीद जवानांच्या धाडसी आणि पराक्रमी त्यागामुळे 'वीरभूमी' म्हणून राज्याची दुसरी ओळख आहे. कारगील युद्धात भारताचे ५२६ जवान हुतात्मा झाले होते. त्यातील एकट्या उत्तराखंड राज्यातील ७५ जवानांनी युद्धात आपल्या प्राणांची आहुती दिली होती.

दोन दशकांपूर्वी (१९९९) झालेले कारगील युद्ध ३ महिने सुरू होते. त्यानंतर २६ जुलै हा दिवस उजाडला आणि पाकिस्तानला भारतासमोर झुकावे लागले. पाकिस्तानला नेस्तनाबूत केलेल्या या युद्धात भारताने ५२६ जवान गमावले होते. 'ऑपरेशन विजय' यशस्वी करून दाखवणाऱ्या हुतात्मा जवानांमध्ये उत्तराखंड राज्यातील तब्बल ७५ जवान शहीद झाले होते. आजही राज्यातील नागरिक हळहळ व्यक्त करतात.

उत्तराखंडच्या कोणकोणत्या भागातून जवान हुतात्मा झाले?

  • पौडी येथून ३ जवान
  • पिथौरागडहून ४ जवान
  • रुद्रप्रयागहून ३ जवान
  • टिहरी येथून ११ जवान
  • उधमसिंहनगरहून २ जवान
  • उत्तरकाशीमधील १ जवान
  • डेहराडूनमधील १४ जवान
  • अल्मोडामधील ३ जवान
  • बागेश्वर येथून ३ जवान
  • चमोली येथून ७ जवान
  • लेंसडान येथील १० जवान
  • चंपावत येथून ९ जवान
  • नैनीतालमधील ५ जवान असे उत्तराखंडचे ७५ जवान 'ऑपरेशन विजय'मध्ये हुतात्मा झाले होते.

कारगिल युद्धानंतर उत्तराखंड जवानांना १५ सेना पदक, २ महावीर चक्र, ९ वीर चक्र आणि मेन्शन डिसप्याचमध्ये ११ पदके मिळाली. आजही देशाच्या सीमेवर उभे असलेल्या प्रत्येक पाचवा जवान उत्तराखंडमधील आहे. उत्तराखंडच्या प्रत्येक तिसऱया घरचा मुलगा सैन्यात देशाची सुरक्षा करत आहे.

Intro:Body:

Dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.