ETV Bharat / bharat

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना कोरोनाची लागण

author img

By

Published : Dec 18, 2020, 7:27 PM IST

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे.यासंदर्भात त्यांनी टि्वट करू माहिती दिली. उत्तराखंडमध्ये सध्या 6 हजार 62 कोरोना रुग्ण असून आतापर्यंत 77 हजार 243 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 384 जणांचा मृत्यू झाला आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत

डेहराडून - देशामध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले असून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज शुक्रवारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. यासंदर्भात त्यांनी टि्वट करू माहिती दिली. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींनी आसोलेट व्हावे आणि कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्रिवेंद्र सिंह रावत यांनी केले आहे.

'आज माझा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझी प्रकृती बरी असून मला कोरोनाची काही लक्षणे नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी होम आयसोलेशनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी', असे त्यांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.

उत्तराखंडमध्ये सध्या 6 हजार 62 कोरोना रुग्ण असून आतापर्यंत 77 हजार 243 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 हजार 384 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात 3 लाख 13 हजार 831 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत 95 लाख 20 हजार 827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 1 लाख 44 हजार 789 जणांचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाची बड्या नेत्यांना लागण -

कोरोनाची अनेक बड्या नेत्यांना कोरोनाची लागण झाली असून काहींचा मृत्यूही झाला आहे. राज्यसभा खासदार अभय भारद्वाज यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. तसेच उत्तर प्रदेशच्या योगी आदित्यनाथ याच्या मंत्रिमंडळात असेलेले चेतन चौहान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल, तामिळनाडू राज्यातील कन्याकुमारी येथून खासदारकी भूषवलेले एच. वसंतकुमार यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर हरयाणाचे आरोग्य मंत्री अनिल विज यांनाही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - गुजरात : मेंदू मृत झालेल्या अडीच वर्षांच्या मुलाने दिले पाच जणांना जीवदान

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.