लखनऊ - उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. पत्नीची हत्या करत तिचे शिर हातात घेऊन पती पोलीस ठाण्यात पोहचला. चिन्नर यादव असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी चिन्नरला ताब्यात घेतले असून मृतदेह शवविच्छदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे.
नेतानगर येथे राहणाऱ्या चिन्नर यादवचे पत्नी विमलाशी (वय 35) घरी सकाळी 7.30च्या सुमारास भांडण झाले. यावेळी त्याने रागाच्या भरात विमालाचे शिर धडावेगळे केले. हत्येनंतर तिचे शिर हातात घेत त्याने पोलीस ठाणे गाठले, असे पोलीस अधीक्षक महेंद्र प्रतापसिंह चौहान यांनी सांगितले. पत्नीचे शीर हातात घेऊन निघालेल्या चिन्नारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेची सध्या सर्वत्र चर्चा असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. उत्तर प्रदेशची बाराबंकीमध्ये तरुणाने पत्नीची हत्या केली होती आणि तिचे शिर हातात घेऊन राष्ट्रगीत म्हणत तो पोलीस ठाण्यात पोहचला होता. तसेच महाराष्ट्रातील पुण्यात 2015मध्ये पत्नीची निर्घृण हत्या करून तिचे कापलेले शिर आणि कुऱ्हाड घेऊनच पती रस्त्यावरून फिरत असल्याची भीषण घटना घडली होती. या घटनेचे फोटो-व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.