लखनऊ : उत्तर प्रदेशचे आरोग्यमंत्री जय प्रताप सिंह कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्याच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये खळबळ माजली आहे. यानंतर त्यांच्या कुटुंबीयांचीही कोरोना चाचणी करण्यात आली आहे.
यानंतर आरोग्यमंत्र्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची यादी बनवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच, त्यांना कोणामार्फत कोरोनाची लागण झाली असावी याचाही शोध घेणे सुरू आहे. त्यांच्या कार्यालयाचे सॅनिटायझेशन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
शुक्रवारी लखनऊमधील केजीएमयूने प्रदेशातील कोरोना बाधितांची संख्या जाहीर केली. यामध्ये आज १९५ नव्या रुग्णांची नोंद झाल्याचे समोर आले. सोबतच राज्याच्या आरोग्यमंत्र्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह आला.
हेही वाचा : विकास दूबे एन्काऊंटर: त्रिसदस्यीय समितीमधील अधिकाऱ्यावर आक्षेप; सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल