ETV Bharat / bharat

योगी सरकारचा मोठा निर्णय, अनुसूचित जातींच्या यादीत 17 OBC जातींचा केला समावेश - Caste

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शुक्रवारी राज्यातील मागासवर्गीय जातींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने अनुसूचित जातींच्या सूचीमध्ये 17 ओबीसी प्रवर्गातील जातींचा समाविष्ट केले आहे.

योगी आदित्यनाथ
author img

By

Published : Jun 29, 2019, 7:45 AM IST

लखनौ - राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यातील मागासवर्गीय जातींसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. योगी सरकारने शुक्रवारी अनुसूचित जातींच्या सूचीमध्ये 17 मागास जातींना (ओबीसी) समाविष्ट केले आहे. ह्या जाती सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहेत, असे योगी सरकाराने म्हटले आहे.

या 17 मागास जातींना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यासाठी जिल्हा अधिकाऱ्यांना या 17 मागास जातींच्या कुटुंबांना जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यापूर्वी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षानेदेखील असाच प्रयत्न केला होता. मात्र तो अपयशी ठरला होते.

कोणत्या जातींचा समावेश-
मागास जातीच्या सुचीमध्ये निषाद, बिंद, मल्लाह, केवट, कश्यप, भर, धीवर, बाथम, मछुआरा, प्रजापती, राजभर, कहार, कुम्हार, धीमर, मांझी, तुरहा, गौंड या जातींचा समावेश आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.