नवी दिल्ली - अमेरिकेत कोरोना संसर्ग तपासणीसाठी पहिल्या घरबसल्या स्वॅब नमुने संकलित करणाऱ्या किटला मान्यता मिळाली आहे. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णांचे नमुने संकलित करण्यासाठी या किटला अधिकृत मान्यता (EUA - Emergency Use Authorization) दिली आहे. लॅब कॉर्प या कंपनीने विकसित केलेल्या या किटमुळे रुग्णाला स्वतः 'नेझल स्वॅब' (रुग्णाने स्वतःच्या नाकपुड्यांमधून घेतलेला स्वॅब) चे नमुने संकलित करून कोरोना विषाणू संसर्ग तपासणीसाठी जमा करता येणार आहेत.
एफडीएने प्रथम 16 मार्चला लॅबकॉर्पला मर्यादित नमुने जमा करण्याची परवानगी दिली होती. हे नमुने आरोग्य सुविधा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून जमा केले जात होते, अशा प्रकारे आणीबाणीच्या परिस्थितीत श्वसन संस्थेतील वरच्या आणि खालच्या भागातील स्वॅब गोळा करण्याची परवानगी देण्यात आली होती. यामुळे प्रयोग शाळांमधील अधिकृत कर्मचारी असे नमुने गोळा करू शकत होते.
'या संपूर्ण महामारी दरम्यान आम्ही रुग्णांना योग्य रोगनिदान मिळावे, यासाठी तपासणी सुविधा विकसित करत आलो आहोत यामध्येच आता विश्वासार्हरित्या घरच्या घरी स्वतःचे स्वॅब नमुने गोळा करू शकणार आहेत,' असे एफडीएचे आयुक्त स्टीफन हान यांनी म्हटले आहे.
सध्या विकसित करण्यात आलेले घरच्या घरी स्वॅब नमुने जमा करणारे किट सुरुवातीला फक्त आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. त्याशिवाय, ते कोरोना विषाणू बाधितांच्या संपर्कात आलेल्या किंवा कोविड-19 ची लक्षणे असलेल्या आणि स्वतःहून पुढे येऊन या किटद्वारे तपासणी करू इच्छिणाऱ्या पहिल्या काही जणांना देण्यात येणार आहे.
या किट बनवण्याची कंपनीची योजना आहे. मात्र, या किटसाठी रुग्णाला एक प्रश्नावली भरणे आवश्यक आहे. शिवाय त्यांना आरोग्य सेवा प्रदात्याकडून शिफारस घेणेही आवश्यक आहे. येत्या काही आठवड्यांत या किट उपलब्ध होतील. मात्र, लॅबकॉर्प सध्या तातडीने किती किटस पुरवू शकेल किंवा उत्पादन करू शकेल ही बाब अद्याप स्पष्ट झालेली नाही.
ईयूएद्वारे घराबसल्या नमुना संकलन करणाऱ्या किटला परवानगी मिळाली आहे. मात्र, सध्या याद्वारे स्वत:ची चाचणी करण्यासाठी लॅबकार्पच्या 'सेंटर फॉर एसोटेरिक टेस्टिंग' आणि इतर क्लिनिकल प्रयोगशाळा सुधारणा दुरुस्ती (सीएलआयए) येथे जावे लागणार आहे, हे नमूद करणे आवश्यक आहे.
ईयूएमध्ये लॅबकॉर्पने काही अटींचे पालन करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. यानुसार, तपासणी होणारे रुग्ण, आरोग्य सेवा प्रदाते आणि ज्या अधिकृत प्रयोगशाळांमध्ये या चाचण्या करण्यासाठी मानक ऑपरेटिंग प्रक्रिया समाविष्ट आहे, त्यांची खरी माहिती द्यावी लागणार आहे.