ETV Bharat / bharat

अत्याचारास विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीला टेरेसवरुन फेकले; उत्तर प्रदेशमधील घटना

ही मुलगी बाहेरुन जेव्हा घरी जात होती, तेव्हा शकील, जुनैद आणि त्यांच्या आणखी एका मित्राने मिळून तिला इमारतीच्या छतावर नेले. यावेळी त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती विरोध करत राहिली. त्यामुळे चिडून या तिघांनी तिला मारहाण करत, इमारतीच्या छतावरुन खाली फेकून दिले...

UP girl thrown off terrace by 3 men for objecting to harassment
अत्याचारास विरोध केल्यामुळे अल्पवयीन मुलीला टेरेसवरुन फेकले; उत्तर प्रदेशमधील घटना
author img

By

Published : Oct 25, 2020, 9:57 AM IST

लखनौ : उत्तर प्रदेशच्या मऊमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अत्याचारास विरोध केल्यामुळे एका १५ वर्षांच्या मुलीला तीन जणांनी चक्क इमारतीच्या छतावरुन खाली फेकले. या घटनेत ही मुलगी गंभीररित्या जखमी झाली असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी ही घटना घडली. ही मुलगी बाहेरुन जेव्हा घरी जात होती, तेव्हा शकील, जुनैद आणि त्यांच्या आणखी एका मित्राने मिळून तिला इमारतीच्या छतावर नेले. यावेळी त्यांनी तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, ती विरोध करत राहिली. त्यामुळे चिडून या तिघांनी तिला मारहाण करत, इमारतीच्या छतावरुन खाली फेकून दिले.

यानंतर गंभीररित्या जखमी झालेल्या या मुलीला आझमगढमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले. शनिवारी तिने झालेल्या प्रकाराबाबत पोलिसांना माहिती दिली. मऊचे पोलीस अधीक्षाक सुशील धुळे यांनी याबाबत सांगितले. ते म्हणाले की याप्रकरणी तीनही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा : वेब सीरिजमध्ये मिर्झापूरचे चुकीचे चित्रीकरण; खासदार अनुप्रिया पटेलांची कारवाईची मागणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.