ETV Bharat / bharat

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून विशेष पॅकेजची घोषणा; 83 लाख मजुरांसह इतरांना मिळणार लाभ - corona crisis

योगी म्हणाले, की उत्तर प्रदेशात राहणाऱ्या बाह्य राज्यांतील लोकांचे, संपूर्ण सन्मानाने आणि खाण्याची व्यवस्था इत्यादींचे संरक्षण करणे, ही आपली जबाबदारी आहे. त्यांची संपूर्ण काळजी घेतली पाहिजे. कामगार व गरजू लोकांना लवकरात लवकर 1000 रुपयांची मदत देण्यात यावे, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

up cm yogi aditynath
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथांकडून विशेष पॅकेजची घोषणा; 83 लाख मजूरांसह इतरांना मिळणार लाभ
author img

By

Published : Apr 2, 2020, 5:59 PM IST

लखनऊ - कोरोना विषाणूमुळे केलेल्या संचारबंदीमुळे दिव्यांग, विधवा महिला, गरीब, मजुरांपासून ते प्राणी आणि पक्ष्यांच्या खाण्यापिण्यासाठी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने 850 कोटी रुपये जाहीर केले आहेत. राज्यात कोणत्याही व्यक्तीने उपाशी झोपू नये. तसेच गायींसाठी चाऱ्याची व्यवस्था करण्याचे निर्देश योगी यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी गुरुवारी कोरोना विषाणूविरूद्ध लढण्यासाठी गठीत टीमच्या महत्त्वपूर्ण अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. गरीब, वृद्ध, विधवा आणि असहाय्य लोकांच्या खात्यावर लवकर पैसे केले जातील, असे सांगितले.

83 लाख लोकांना मदत मिळेल -

समाज कल्याण विभाग, दिव्यांग कल्याण विभाग आणि महिला कल्याण विभागाकडून जवळपा 83 लाख लोकांना मदत मिळणार आहे. यापूर्वी योगी सरकारने मनरेगा कामगारांना एका दिवसात 611 कोटी दिले होते.

'लॉकडाउनचे अनुसरण करणे गरजेचे'

योगी बैठकीत म्हणाले, की 100 टक्के लॉकडाऊन अनुसरण केले जावे. पोलीस कर्मचारी लोकांना समजावून सांगत आहेतच. जर लोकांनी कायद्याचे पालन न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करा. प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळायला हवे. एखाद्याने उपाशी राहू नये. सुरक्षित अंतर ठेवून अत्यावश्यक वस्तू आणण्यास बाहेर पडा, असे आवाहन पोलीस आणि नागरिकांनी योगी यांनी केले.

'दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाहून परत आलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटली पाहिजे'

दिल्लीतील तबलिगी जमातच्या कार्यक्रमाहून परत आलेल्या प्रत्येक व्यक्तीचा शोध घ्यावा. जे परदेशी आहेत त्यांचे पासपोर्ट ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी करावी. जर कायदा मोडला असेल आपत्ती कायदा 2005नुसार कारवाई झाली पाहिजे. ज्यांनी बेकायदेशीरपणे परदेशींना निवारा दिला आहे, त्यांच्यावर कडक कारवाई केली जावी.

तबलीगी जमातच्या 1330 जणांना ओळखले

बुधवारी तबलीगी जमातमधील 569 लोकांची ओळख पटली, परंतु सूत्रांच्या माहितीनुसार उत्तर प्रदेशात तबलिगीशी संबंधित 1330 लोकांची ओळख पटली आहे. त्यापैकी 258 परदेशी नागरिक आहेत. या सर्व प्रकाराची चौकशी केली जात आहे. 200 लोकांचे पासपोर्ट जप्त करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सर्व लोकांवर बेकायदा आश्रयाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

'सहकार्य न केल्यास कारवाई केली जाईल'

योगी म्हणाले, की पोलीस किंवा आरोग्य कर्मचारी यांना सहकार्य न केल्यास आणि गैरवर्तन केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. तसेच लॉकडाऊनदरम्यान राज्य कर्मचार्‍यांच्या पगारामध्ये कोणतीही कपात होणार नाही

'बाहेरील लोकांना सर्वतोपरी मदत केली जाईल'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.