ETV Bharat / bharat

लॉकडाऊनमध्ये बहरीचमधील गोहत्या वाढल्या; भाजप नेत्याचा आरोप.. - बहरीच गोवंश हत्या

लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बहरीच जिल्ह्यात होणाऱ्या गोवंश हत्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये बैल, बछडे यांच्यासह गाईंचाही काही प्रमाणात समावेश आहे. हे जर असेच चालू राहिले, तर राज्याच्या राजधानीपासून अवघे १३० किलोमीटर असलेल्या या जिल्ह्यामध्ये कुठेच गाई दिसणार नाहीत.

UP: BJP MLA claims cow slaughter incidents rising' in Bahraich amid lockdown
लॉकडाऊनमध्ये बहरीचमधील गोहत्या वाढल्या; भाजप नेत्याचा आरोप..
author img

By

Published : May 8, 2020, 2:32 PM IST

लखनऊ - उत्तर प्रदेशच्या महासी विधानसभेतील भाजप आमदार सुरेश्वर सिंह यांनी गोहत्येसंदर्भात गंभीर आरोप केला आहे. लॉकडाऊनदरम्यान बहरीच जिल्ह्यामधील गोहत्या प्रकरणांमध्ये वाढ झाली असल्याचा आरोप सिंह यांनी केला आहे.

याबाबत त्यांनी राज्याच्या अतिरिक्त मुख्य गृहसचिवांना पत्र लिहिले आहे. यामध्ये त्यांनी लिहिले आहे, की लॉकडाऊन लागू झाल्यानंतर बहरीच जिल्ह्यात होणाऱ्या गोवंश हत्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये बैल, बछडे यांच्यासह गाईंचाही काही प्रमाणात समावेश असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले, की हे जर असेच चालू राहिले, तर राज्याच्या राजधानीपासून अवघे १३० किलोमीटर असलेल्या या जिल्ह्यामध्ये कुठेच गाई दिसणार नाहीत.

यासोबतच जिल्हातील काही भागांमध्ये गायी चोरी होण्याचे प्रमाणही वाढले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गाईंची चोरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या गुन्हेगारांना अटक केल्यानंतर अवघ्या दोन दिवसांमध्ये पॅरोलवर सोडले जाते, असा आरोपही त्यांनी केला आहे. पोलीस अधीक्षक विपिन मिश्रा यांना विचारले असता, त्यांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा : केंद्राने कोरोनाशी लढताना राज्य सरकारला विश्वासात घेणे गरजेचे - राहुल गांधी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.