नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून अनलॉक-३ची नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कन्टेन्मेंट झोनव्यतिरिक्त इतर भागांमधील निर्बंध शिथील करण्यावर सरकारने भर दिला आहे. एक ऑगस्टपासून लागू होणाऱ्या या अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यामध्ये काय सुरू असेल आणि काय बंद; पाहूयात...
- नाईट कर्फ्यू, म्हणजेच रात्री लागू असणारी संचारबंदी हटवण्यात आली आहे.
- पाच ऑगस्टनंतर योग साधना केंद्र आणि व्यायामशाळा उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. यासंदर्भातील नियमावली लवकरच आरोग्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात येईल.
- फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करत स्वातंत्र्यदिन साजरा करण्यास परवानगी.
- शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लासेस हे ३१ ऑगस्टपर्यंत बंद राहतील.
- वंदे भारत मिशनअंतर्गत परदेशातील प्रवासी विमान वाहतूक सुरू राहील.
- कन्टेन्मेंट झोन्सबाहेरील पुढील गोष्टी वगळता इतर गोष्टी सुरू करण्यास परवानगी..
- मेट्रो
- सिनेमागृहे, जलतरण तलाव, बाग, नाट्यगृहे, बार, सभागृहे
- सामाजिक/राजकीय/क्रीडा/मनोरंजन/शैक्षणिक/सांस्कृतिक/धार्मिक कार्यक्रम आणि सभा..
या गोष्टी सुरू करण्याची परवानगी कधीपासून मिळेल याबाबत स्वतंत्रपणे माहिती देण्यात येईल.
- कन्टेन्मेंट झोन्समध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊन लागू असेल.
दरम्यान, केंद्र सरकारने याबाबत नियमावली जाहीर केली असली, तरीही राज्य सरकार राज्यातील परिस्थिती पाहून याबाबत स्वतंत्र निर्णय घेऊ शकते. कन्टेन्मेंट झोनबाहेरही एखाद्या बाबतीत बंदी लागू करण्याची परवानगी राज्य सरकारला आहे. मात्र, राज्यांतर्गत आणि आंतरराज्यीय माल वाहतूक आणि प्रवासी वाहतूकीसाठी राज्य सरकार कोणतेही बंधन घालू शकणार नाही. तसेच यासाठी कोणत्याही विशेष पासची आवश्यकता नसणार आहे.
हेही वाचा : नव्या शैक्षणिक धोरणाला कॅबिनेटची मंजुरी; उच्च शिक्षणात मोठ्या सुधारणा