नवी दिल्ली - फ्रान्समधील जी-७ परिषदेत, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट झाली. यावेळी त्यांनी अनेक मुद्यावर चर्चा केली. यावेळी दोघांमध्ये मैत्रीची छाप पाहायला मिळाली.
-
#WATCH France: US President Donald Trump jokes with Prime Minister Narendra Modi during the bilateral meeting on the sidelines of #G7Summit. Trump says, "He (PM Modi) actually speaks very good English, he just doesn't want to talk" pic.twitter.com/ee66jWb1GQ
— ANI (@ANI) August 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH France: US President Donald Trump jokes with Prime Minister Narendra Modi during the bilateral meeting on the sidelines of #G7Summit. Trump says, "He (PM Modi) actually speaks very good English, he just doesn't want to talk" pic.twitter.com/ee66jWb1GQ
— ANI (@ANI) August 26, 2019#WATCH France: US President Donald Trump jokes with Prime Minister Narendra Modi during the bilateral meeting on the sidelines of #G7Summit. Trump says, "He (PM Modi) actually speaks very good English, he just doesn't want to talk" pic.twitter.com/ee66jWb1GQ
— ANI (@ANI) August 26, 2019
तुम्ही आम्हाला बोलू द्या. आम्ही दोघे बोलत राहू. जेव्हा गरज लागेल तेव्हा तुमची मदत मागितली जाईल. असे मोदी म्हणाले. त्यावर हे खुप चांगले इंग्रजी बोलतात. मात्र त्या भाषेमधून बोलत नाहीत, असे ट्रम्प यांनी म्हटले. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हसत ट्रंम्प यांच्या हातावर जोरात टाळी मारली. हे पाहून तेथील सर्वजण हसायला लागले. या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
जी-७ परिषदेमध्ये मोदी आणि ट्रम्प यांनी काश्मीरबाबत चर्चा केली. यावेळी परिस्थिती नियंत्रणात असल्याचा मोदींना विश्वास आहे. ते पाकिस्तानशी चर्चा करतील, आणि मला खात्री आहे की ते हा मुद्दा चांगल्या प्रकारे हाताळतील", असे मत ट्रम्प यांनी व्यक्त केले.
जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवण्यात आले. यानंतर भारत-पाकिस्तान संबंध ताणले आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मागील महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली होती. यावेळी काश्मीर प्रश्नावर मध्यस्ती करण्यास तयार असल्याचे वक्तव्य ट्रम्प यांनी केले होते.