जबलपूर- माणुसकीबरोबरच शहरात जातीय ऐक्याचे उदाहरण पाहायला मिळाले. जिथे हिंदू प्रथांनुसार स्त्रीला अर्थीवर ठेवण्यात आले. पुजाविधी करण्यात आला. त्यानंतर, मुस्लिम परंपरेनुसार त्या महिलेवर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रभा उर्फ परवीनची कहाणी
जबलपूरच्या प्रभा सोनकर यांचा सुमारे 35 वर्षांपूर्वी एका मुस्लिम कुटुंबात प्रेम विवाह झाला होता. प्रभा सोनकर यांनी लग्नानंतर धर्मांतर केले आणि ती परवीन बी झाल्या. परवीन बी यांच्या पतींचा सुद्धा मुत्यु झाला आहे. जबलपूरमधील रामपूर भागात प्रभा त्यांची बहीण नरवत सोनकर यांच्या घरी आल्या होत्या. पण तबीयत खराब झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला.
हिंदू आणि मुस्लिम परंपरेनुसार केले अंत्यसंस्कार-
प्रभाच्या मृत्यूनंतर प्रभा कोणत्या परंपरेनुसार अंत्यसंस्कार केले पाहिजेत, अशी समस्या उद्भवली. या प्रकरणी प्रभाच्या बहिणीच्या कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाकडे मदत मागितली. गरीब नवाज समितीचे इनायत अली यांना जिल्हा प्रशासनाने जबाबदारी दिली. त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
हेही वाचा- खास मुलाखत : राज्यातील परिस्थिती पाहूनच दहावी-बारावीच्या परीक्षेचा निर्णय - वर्षा गायकवाड