ETV Bharat / bharat

हरसिमरत कौर बादल यांचा केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा; एनडीएत फूट? - केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल

केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Union minister Harsimrat Kaur Badal
केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल
author img

By

Published : Sep 17, 2020, 9:09 PM IST

Updated : Sep 17, 2020, 9:23 PM IST

नवी दिल्ली - मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या तीन शेतीविषयक विधेयकांच्या निषेध व्यक्त करत केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. याआधी त्यांचे पती शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीर सिंह बादल यांनी लोकसभेत आज (गुरुवारी) त्यांच्या राजीनाम्याबाबत घोषणा केली. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. शेतकर्‍यांचे व्यापार व वाणिज्य (संवर्धन व सुविधा) विधेयक आणि किंमत आश्वासन व शेत सेवा विधेयकावरील शेतकरी (सशक्तीकरण व संरक्षण) करारावरील विधेयकावरील चर्चेदरम्यान ते बोलत होते.

  • I have resigned from Union Cabinet in protest against anti-farmer ordinances and legislation. Proud to stand with farmers as their daughter & sister.

    — Harsimrat Kaur Badal (@HarsimratBadal_) September 17, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या विधेयकाला विरोध करत अन्नधान्याच्या उत्पादनात भारताला स्वयंपूर्ण बनवण्यात पंजाबच्या मोठ्या योगदानाची आठवणही त्यांनी यावेळी करुन दिली. यावेळी ते म्हणाले, पंजाब सरकारने कृषी क्षेत्र तयार करण्यासाठी केलेली 50 वर्षांची मेहनत हे प्रस्तावित कायदे नष्ट करतील. म्हणून केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल आपल्या पदाचा राजीनामा देतील, अशी घोषणा त्यांनी केली. मोदी सरकारमध्ये शिरोमणी अकाली दल पक्षातील त्या एकमेव मंत्री होत्या. शिरोमणी अकाली दल हा भाजपाचा सर्वात जुना मित्रपक्ष आहे.

Last Updated : Sep 17, 2020, 9:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.