नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंग्लंडमधील सार्वत्रिक निवडणुकांमधील विजयासाठी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे अभिनंदन केले. त्यांच्या हुजूर पक्षाने निवडणुकीत बहुमत मिळवले. यानंतर मोदींनी त्यांना शुभेच्छा देतानाच भारत आणि इंग्लंड यांच्यादरम्यानचे संबंध अधिक मजबूत होतील, अशी आशा व्यक्त केली.
-
Many congratulations to PM @BorisJohnson for his return with a thumping majority. I wish him the best and look forward to working together for closer India-UK ties. pic.twitter.com/D95Z7XXRml
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Many congratulations to PM @BorisJohnson for his return with a thumping majority. I wish him the best and look forward to working together for closer India-UK ties. pic.twitter.com/D95Z7XXRml
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2019Many congratulations to PM @BorisJohnson for his return with a thumping majority. I wish him the best and look forward to working together for closer India-UK ties. pic.twitter.com/D95Z7XXRml
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2019
'पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना त्यांनी पुन्हा एकदा प्रचंड बहुमत मिळवल्याबद्दल खूप-खूप शुभेच्छा. मी त्यांच्या पुढील कार्यासाठी सदिच्छा व्यक्त करतो. पुढील काळात भारताचे इंग्लंडसोबतचे संबंध अधिक मजबूत होतील,' असे ट्विट मोदींनी केले आहे.
जॉन्सन यांच्या हुजूर पक्षाने शुक्रवारी निवडणुकीत प्रचंड बहुमतासह विजय मिळवला. आता ते ब्रेग्झिटमधून बाहेर पडण्यासाठीचे प्रयत्न सुरूच ठेवतील. तसेच, या विषयावर पुन्हा सार्वमत घेण्याच्या शक्यताही राहणार नाहीत. या ब्रिटनमधील चार वर्षांतल्या तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका होत्या. याआधी जून २०१६ मध्ये ब्रेक्झिटवर सार्वमत घेण्यात आले होते.