ETV Bharat / bharat

सुकमाच्या कुडकीपारात २ तरुणांचा संशयित मृत्यू, लॉकडाऊनआधीच परतले होते गावी - सुकमाच्या कुडकीपारात २ तरुणांचा संशयित मृत्यू

गावातील सर्दी आणि ताप असणाऱ्या १५ रहिवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेट्टी हडमा या २१ वर्षीय मृताला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि ताप होता. याच दरम्यान १९ एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. यानंतर काहीच वेळात गावातीलच पोड़ियाम भीमा नावाच्या ३० वर्षीय युवकाचाही मृत्यू झाला. त्याला उलटी आणि तापासारख्या समस्या होत्या.

सुकमाच्या कुडकीपारात २ तरुणांचा संशयित मृत्यू

author img

By

Published : Apr 22, 2020, 1:04 PM IST

सुकमा - कोटा विकासखंडातील कोत्ताचेरुजवळील गगनपल्ली पंचायतीच्या कुडकीपारा गावात दोन युवकांचा मृत्यू झाला. २४ तासात घडलेल्या या घटनाांमुळे आरोग्य विभागासह संपूर्ण गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमधील एक युवक लॉकडाऊवपूर्वीच गावी परतला होता. घटनेची माहिती मिळताच आरोग्य विभागाची टीम गावात पोहोचली आणि तपास सुरू केला. दोघांच्याही मृत्यूचे कारण सामान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

गावातील सर्दी आणि ताप असणाऱ्या १५ रहिवाशांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वेट्टी हडमा या २१ वर्षीय मृताला गेल्या काही दिवसांपासून सर्दी, खोकला आणि ताप होता. याच दरम्यान १९ एप्रिलला त्याचा मृत्यू झाला. यानंतर काहीच वेळात गावातीलच पोड़ियाम भीमा नावाच्या ३० वर्षीय युवकाचाही मृत्यू झाला. त्याला उलटी आणि तापासारख्या समस्या होत्या. याबाबतची माहिती मिळताच आरोग्य विभागाचे कर्मचारी गावात पोहोचले आणि १५ लोकांना क्वारंटाईन केले.

गावात मेडिकल कॅम्प -

गावात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी आधीच लॉकडाऊन आहे. अशात दोन तरुणांचा मृत्यू हा गावकऱ्यांसाठी चर्चेचा विषय बनला होता. याचवेळी आरोग्य विभागाने हे कोरोनाचे बळी नसल्याचे स्पष्ट केले. याशिवाय गावात मेडिकल कॅम्प लावून लोकांना औषधेही वाटली

कोटाचे एसडीएम हिमाचल साहू यांने सांगितले, की मृत युवक लॉकडाऊनपूर्वीच गावी परतला होता. त्यानंतर एका महिन्याने त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे, हा कोरोनाचा बळी नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.