ETV Bharat / bharat

वाढदिवसादिनी तो अडकलाय बोअरवेलमध्ये, २ वर्षांच्या फतेहवीरच्या सुटकेसाठी बचावकार्य सुरू - संगरूर

२ वर्षाचा फतेहवीर ६ जूनला ४ वाजण्याच्या सुमारास बोअरमध्ये अडकला. आज त्याचा वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवसादिनी तो बोअरवेलमध्ये अडकून पडला आहे.

बचावकार्य
author img

By

Published : Jun 10, 2019, 4:57 PM IST

संगरूर - पंजाबमधील संगरूर जिल्ह्यात १५० फूट खोल बोअरवेलमध्ये २ वर्षांचा फतेहवीर नावाचा मुलगा अडकला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठीच्या बचावकार्याचा आजचा पाचवा दिवस आहे. परंतु, अद्यापही त्याला बाहेर काढण्यात आले नसल्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

rescue
बचावकार्य

२ वर्षाचा फतेहवीर ६ जूनला ४ वाजण्याच्या सुमारास बोअरमध्ये अडकला. आज त्याचा वाढदिवस आहे. मात्र, वाढदिवसादिनी तो बोअरवेलमध्ये अडकून पडला आहे. त्याला बाहेर काढण्यासाठी होत असलेल्या उशिरासाठी नागरिक सरकारला जबाबदार धरत आहेत. यासाठी लोकांनी रास्ता रोकोही केला आहे. याआधीही तांत्रिक कारणामुळे ४ तास खोदकाम बंद करण्यात आले होते.

अधिकाऱ्यांनी सांगितले आहे, की मुलापर्यंत पोहचण्यासाठी अजून १० ते १२ फूट खोदकामाची आवश्यकता आहे. कठीण भूगर्भ असल्यामुळे तज्ञांच्या मदतीने एका नवीन उपकरणाच्या आधारे खोदकाम करण्यात येणार आहे. मुलाजवळ पोहचण्यासाठी त्याच्या समांतर एक सुरुंग खोदण्यात येत आहे.

Intro:Body:

Nat 14

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.