बिकानेर (राजस्थान) - आज (दि. 27 जून) सकाळी राजस्थानच्या बिकानेर जिल्ह्यामध्ये एक भीषण अपघात झाला. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना बिकानेरच्या गजनेर ठाणे हद्दीतील कोलायत व गोलरीच्या दरम्यान राज्यमार्गावर घडली असून मृतांची ओळख अद्याप पटली नाही.
या मार्गावर एक कंटेनर व डंपरची समोरासमोर धडक झाली. या धडकेत कंटेनरची डिझेल टाकी फुटली. यामुळे दोन्ही वाहनांमध्ये आग लागली. कंटेनर व डंपरमध्ये अचानक आग लागल्याने दोन्ही वाहनांतील चालकांचा होरपळून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच कोलायत ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
कोलायत पोलीस ठाण्याचे अधिकारी विकास विश्नोई यांनी सांगितले की, डंपर कोलायतहून बिकानेरकडे जात होता. ज्यामध्ये वाळू होती आणि बिकानेरहून कोलायतकडे जाणारा कंटेनर हा रिकामा होता. या अपघातानंतर आग विझविण्यात आली असून दोन्ही वाहने रस्त्यावरुन बाजूला करण्याचे काम सुरू आहे.
घटनेचा तपास पोलीस करत असून वाहनांच्या मालकांना शोध सुरू आहे. मालकांचा शोध लागल्यानंतर मृतांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात येणार आहे.
हेही वाचा - देशात कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली पाच लाख पार, महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण