फतेहपुर(सीकर, राजस्थान) - राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६५ वर कारंगा गावाजवळ विचित्र अपघात झाला. तीन ट्रक एकमेकांवर धडकल्याने लागलेल्या आगीत दोन जण जिवंत जळाले आहेत.
शनिवारी रात्री राजस्थानच्या फतेहपूर येथील कारंगा गावाजवळ हा अपघात झाला. यात ३ ट्रक एकमेकांवर आदळले. ही टक्कर ईतकी भीषण होती की अपघातानंतर या ट्रकनी पेट घेतला. यात २ जण जिवंत जाळले गेले आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असून महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.