ETV Bharat / bharat

देशभरात फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटरवर छापा, वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

फसवणूक करण्यासाठी जिओ कंपनीचे मोबाईलचा वापर होत असल्याचा याप्रकरणी उघडकीस आले. स्थानिक मजुरांना काही रक्कम देत त्यांच्या नावाने मोबाईलचे सिम घ्यायचे आणि त्यांच्या खात्यावर पैसे बोलावायचे एकदा काम झाले की खाते आणि मोबाईल नंबर बंद व्हायचा. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडचण निर्माण होत असे.

two arrested for fraud
author img

By

Published : Mar 1, 2019, 11:39 PM IST

वर्धा - लकी ड्रॉ लागला म्हणून विविध कारणासाठी पैसे मागवत फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील एका बनावट कॉल सेंटरवर वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. दिल्लीच्या ओखला इंडस्ट्रियल परिसरात ही कारवाई करत 6 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच २ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांना पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कॉल सेंटर पूर्णतः शोध घेत अटक करण्यात यश आले आहे.

two arrested for fraud

या कॉल सेंटरच्या माध्यमातून जवळपास दोन कोटींचे व्यवहार झाले असून देशभरात फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. राहुल सुजन सिंग यादव वय २२, उत्तर प्रदेश, पंकज जगदीश राठोड वय २८, संगम विहार दिल्ली, या दोघांना अटक केली.

वर्ध्यातील रामनगर पोलीस स्टेशन येथे ऋषभ कैलास करंडे यांना लकी ड्रॉमध्ये नंबर लागली म्हणून केटीएम मोटर मोटरसायकल लागल्याचे सांगण्यात आले. यासाठी विविध कारणांनी जवळपास ३ लाख ६० हजार रुपये भरून घेतले. पैसे देऊन गाडी न मिळाल्याने त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामनगर पोलीस जानेवारी महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली आणि अप्पर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा शोध सुरू करण्याचे निर्देश दिले. फसवणुकीचे धागेदोरे दिल्ली येथील ओखला परिसरातील इंडस्ट्रियल एरिया मध्ये एका कॉल सेंटरच्या माध्यमातून चालत असल्याची माहिती तपासात पुढे आली.
स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने ७ दिवस दिल्ली येथे ओखला परिसरात पिंजून काढल्यानंतर देशभरात फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर पर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. त्यानंतर वर्ध्यातील गुन्ह्यात याच सेंटरद्वारे फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी कॉल सेंटरवर १० ते १५ मुल - मुली काम करत असल्याच दिसून आले. पीआर इंटरप्राइजकडून फॅशन विला नावे फसवणूक होत असे. सुरुवातीला दोन-तीन वस्तूचा कॉम्बो पॅक फॅशन विला कंपनीच्या माध्यमातून दिला जात असे. एकदा वस्तू मिळाल्यानंतर लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला म्हणून वस्तू किंवा कार बाईक पाठवण्यासाठी पैसे मागत. कर भरायला, टोल टॅक्स, कुरियर, असे विविध कारणे सांगत पैसे उकळत असे. अडीच लाखाच्या बाईकसाठी जवळपास ३ लाख ६० हजार रुपये घेण्यात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

undefined

फसवणुकीसाठी मजुरांचा मोबाईल आणि बँक खात्याचा उपयोग -
फसवणूक करण्यासाठी जिओ कंपनीचे मोबाईलचा वापर होत असल्याचा याप्रकरणी उघडकीस आले. स्थानिक मजुरांना काही रक्कम देत त्यांच्या नावाने मोबाईलचे सिम घ्यायचे आणि त्यांच्या खात्यावर पैसे बोलावायचे एकदा काम झाले की खाते आणि मोबाईल नंबर बंद व्हायचा. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात अडचण निर्माण होत असे.

कॉल सेंटर पर्यंत पोहोचण्यात पहिल्यांदाच यश -
फसवणुकीचे अनेक प्रकार होतात. यामध्ये फेक मोबाईल नंबर आणि बँक खाते यांचा उपयोग होतो. पण त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश येत असे. या प्रकरणात सखोल शोध घेतला असता फसवणूक करणारे कॉल सेंटर आणि पहिल्यांदाच हाती लागलेले आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कामावर सध्या कौतुकाचा वर्षा होत आहे. तसेच इतर पोलिस ठाण्यातून अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने तपासासाठी या आरोपींची मागणीसुद्धा होत आहे.

मोबाईल लॅपटॉपसह 6 लाखाचा मुद्देमाल जप्त -
जप्त केलेले साहित्य यामध्ये १५ कम्प्युटर २८ मोबाईल लँडलाईन आणि प्रिंटर असे जवळपास ६ लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सेंटरवर काम करणारे १४ मुला-मुलींना पाच मार्चला याप्रकरणी पुढील तपासासाठी ताकीद देत वर्ध्यात बोलावण्यात आलेले आहे. राहुल सुजन सिंग यादव वय २२, उत्तर प्रदेश हा मॅनेजर असून पी-आर कंपनीचा मालक म्हणून पंकज जगदीश राठोड वय २८, संगम विहार दिल्ली याला अटक करून वर्ध्यात आणण्यात आले आहे.
याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, पीएसआय महेंद्र इंगळे, पोलीस कर्मचारी सलाम कुरेशी, स्वप्निल भारद्वाज, छाया तेलगोटे, कुलदीप टांकसाळे, कुणाल हिवसे,अनुप कावळे, जगदीश डफ, दिनेश बोथकर, निलेश कटोजवार, अक्षय राऊत अभिजीत वाघमारे, आनंद भस्मे, दिवाकर परिमल, मुकेश येल्ले आदींनी तपासत कार्य करत गुन्हा उघडकीस आणला.

Intro:मराठी हिंदी दोन्ही बाईट सोबत जोडले आहे, सोबत फोटो पण आहे.

देशभरात फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील कॉल सेंटरवर कारवाई, वर्धा स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

वर्धा
- लोकांची फसवणूक करत 2 कोटींचा घरात गंडा
- बक्षीस लागल्याच्या नावावर होत फसवणूक
- दिल्लीतून चालणारा सेंटरवरून देश भरात फसवणूक
- मजुरांचा नावे मोबाईल आणि बँक खाताच्या वापर

लकी ड्रॉ लागला म्हणून विविध कारणासाठी पैसे मागवत फसवणूक करत. दिल्ली चालणाऱ्या अशाच एका फेक कॉल सेंटरवर वर्धेच्या स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई केली. दिल्लीच्या ओखला इंडस्ट्रियल परिसरात ही कारवाई करत जळगाव 6 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन जणांना अटक करण्यात आली आहे पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात कॉल सेंटर पूर्णतः शोध घेत अटक करण्यात यश आले आहे. या कॉलसेंटरच्या माध्यमातून जवळपास दोन कोटींचे व्यवहार झाले असून देशभरात फसवणूक झाल्याचे प्राथमिक तपासात उघडकीस आले आहे. राहुल सुजन सिंग यादव वय 22 उत्तर प्रदेश, पंकज जगदीश राठोड वय 28 संगम विहार दिल्ली, या दोघांना अटक केली.

वर्ध्यातील रामनगर पोलीस स्टेशन येथे ऋषभ कैलास करंडे यांना लकी ड्रॉमध्ये नंबर लागली म्हणून केटीएम मोटर मोटरसायकल लागल्याचे सांगण्यात आले. यासाठी विविध कारणांनी जवळपास तीन लाख 60 हजार रुपये भरून घेतले. पैसे देऊन गाडी न मिळाल्याने त्यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच रामनगर पोलीस जानेवारी महिन्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला. याप्रकरणात पोलीस अधीक्षक डॉ.बसवराज तेली आणि अप्पर पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी सायबर सेल आणि स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा शोध सुरू करण्याचे निर्देश दिले. फसवणुकीचे धागेदोरे दिल्ली येथील ओखला परिसरातील इंडस्ट्रियल एरिया मध्ये एका कॉल सेंटरच्या माध्यमातून चालत असल्याची माहिती तपासात पुढे आली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने सात दिवस दिल्ली येथे ओखला परिसरात पिंजून काढल्यानंतर देशभरात फसवणूक करणाऱ्या कॉल सेंटर पर्यंत पोहोचण्यात यश मिळाले. त्यानंतर वर्ध्यातील गुन्ह्यात याचाच सेंटरने फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले. यावेळी कॉल सेंटरवर दहा ते पंधरा मुलं मुली काम करत असल्याच दिसून आले. पी आर इंटरप्राइजकडून फॅशन विला नावे फसवणूक होत. सुरुवातीला दोन-तीन वस्तूचा कॉम्बो पॅक फॅशन विला कंपनीच्या माध्यमातून देत. एकदा वस्तू मिळाली त्यानंतर लकी ड्रॉ मध्ये नंबर लागला म्हणून वस्तू किंवा कार बाईक पाठवण्यासाठी पैसे मागत. कर भरायला, टोल टॅक्स, कुरियर, असे विविध कारणे सांगत पैसे उकळत असे.अडीच लाखाच्या बाईकसाठी जवळपास 3 लाख 60 हजार रुपायर घेण्यात आल्यानंतर फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

फसवणुकीसाठी मजुरांचा मोबाईल आणि बँक खात्याचा उपयोग.....

फसवणूक करण्यासाठी जिओ कंपनीचे मोबाईलचा वापर होत असल्याचा याप्रकरणी उघडकीस आले. स्थानिक मजुरांना काही रक्कम देत त्यांच्या नावाने मोबाईलचे सिम घ्यायचे आणि त्यांच्या खात्यावर पैसे बोलावायचे एकदा काम झाले की खाते आणि मोबाईल नंबर बंद व्हायचा. त्यामुळे पोलिसांना तपास करण्यात चांगलीच अडचण निर्माण होत असे.

कॉल सेंटर पर्यंत पोहोचण्यात पहिल्यांदाच यश.....
फसवणुकीचे अनेक प्रकार होतात यामध्ये फेक मोबाईल नंबर आणि बँक खाते याचा उपयोग होते. पण त्यांच्या पर्यंत पोहोचण्यात पोलिसांना अपयश येत असत. या प्रकरणात मर्यादेपलीकडे जाऊ शोध घेतला असता फसवणूक करणारे कॉल सेंटर आणि पहिल्यांदाच हाती लागलेले आहे. यामुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या कामावर सध्या कौतुकाचा वर्षा होत आहे. तसेच इतर पोलिस स्टेशन मधून अशाच प्रकारचे गुन्हे दाखल असल्याने तपासासाठी या आरोपींची मागणीसुद्धा होत आहे.

मोबाईल लॅपटॉपसह 6 लाखाचा मुद्देमाल जप्त.....

जप्त केलेले साहित्य यामध्ये 15 कम्प्युटर 28 मोबाईल लँडलाईन आणि प्रिंटर असं साहित्य जवळपास 6 लाख रुपयाचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. या सेंटरवर काम करणारे 14 मुला-मुलींना पाच मार्चला याप्रकरणी पुढील तपासासाठी ताकीद देत वर्धात बोलावण्यात आलेले आहे. राहुल सुजन सिंग यादव वय 22 उत्तर प्रदेश हा मॅनेजर असून पि आर कंपनीचा मालक म्हणून पंकज जगदीश राठोड वय 28 संगम विहार दिल्ली याला अटक करत वर्ध्यात आणण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, पीएसआय महेंद्र इंगळे, पोलीस कर्मचारी सलाम कुरेशी, स्वप्निल भारद्वाज, छाया तेलगोटे, कुलदीप टांकसाळे, कुणाल हिवसे,अनुप कावळे, जगदीश डफ, दिनेश बोथकर, निलेश कटोजवार, अक्षय राऊत अभिजीत वाघमारे, आनंद भस्मे, दिवाकर परिमल, मुकेश येल्ले आदींनी तपासत कार्य करत गुन्हा उघडकीस आणला.

Body:पराग ढोबळे,वर्धा.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.