ETV Bharat / bharat

तिहेरी तलाक विधेयक मंजूर होणार? आज लोकसभेमध्ये चर्चा - तिहेरी तलाक कायद

प्रस्तावित तिहेरी तलाक कायद्यामध्ये तत्काळ तलाक देणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला गुन्हेगार समजण्यात आले आहे. तसेच अशा व्यक्तीला ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे.

तिहेरी तलाक विधेयक
author img

By

Published : Jul 25, 2019, 10:29 AM IST

Updated : Jul 25, 2019, 12:10 PM IST

नवी दिल्ली - लोकसभेमध्ये आज (गुरुवारी) विवादित 'तिहेरी तलाक' विधेयकावर चर्चा होणार आहे. भाजप सरकार विधेयक मंजूर करण्यासाठी आक्रमक असताना विरोधक मात्र, कायद्यावर आक्षेप घेत विरोध करण्याच्या पवित्र्यात आहेत.

आज गुरुवारी विधेयकाच्या चर्चेवेळी लोकसभा सदनामध्ये हजर राहण्याबाबचा व्हिप (आदेश) भाजपने सर्व खासदारांना जारी केला आहे. विधेयक लोकसभेमध्ये पारित झाले तरी बहुमताअभावी राज्यसभेमध्ये अडकण्याची शक्यता आहे.

प्रस्तावित तिहेरी तलाक विधेयकामध्ये तोंडी तलाक देणाऱ्या मुस्लीम व्यक्तीला गुन्हेगार समजण्यात आले आहे. तसेच अशा व्यक्तीला ३ वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. या तरतुदीला काँग्रेस पक्षासह अनेक पक्षांनी विरोध दर्शवला आहे. विरोधकांसह भाजपचा सहकारी पक्ष जनता दलही या कायद्याच्या विरोधात आहे. पुढील चर्चेसाठी विधेयक संसदीय समितीकडे पाठवण्यात यावे, अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

प्रस्तावित तिहेरी तलाक कायद्यामुळे समाजामध्ये लैंगिक समानता प्रस्थापित होणार असल्याचे भाजपने म्हटले आहे. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात विधेयक संसदेत मांडण्यात आले होते. मात्र, बहुमताअभावी विधेयक राज्यसभेमध्ये बारगळले होते.

Intro:Body:

north korea tested two missiles in east sea

north korea, south korea, kim jong un, east sea, missile test, sea, korea conflict, उत्तर कोरीयाची   

उत्तर कोरियाची पुन्हा आगळीक; पुर्व समुद्रात दोन क्षेपणास्त्रांची चाचणी 

सेऊल - उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियामधील वाद संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. उत्तर कोरियाने पुर्व समुद्रामध्ये पुन्हा दोन क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली आहे. ही क्षेणपणास्त्रे कशा प्रकारची आहेत, हे मात्र समजू शकले नाही. 

गुरुवारी सकाळी (स्थानिक वेळेनुसार) ५.३० आणि ५.५७ वाजता दोन क्षेपणास्त्रे पुर्व समुद्रात (सी ऑफ जपान) डागण्यात आली. उत्तर कोरियातील वोनसॅन भागातून डागण्यात आलेल्या ही क्षेपणास्त्रे ४३० कि.मी पर्यंत गेल्याचे स्थानिक माध्यमांनी सांगितले.

आमची सुरक्षा दले सर्व घडामोडींवर नजर ठेवून आहेत. उत्तर कोरियाकडून आणखी क्षेपणास्त्रांची चाचणी घेण्यात येत आहे का ? यावरही आम्ही नजर ठेवून आहोत. तसेच आम्ही पुर्णपणे सतर्क आहोत, असे दक्षिण कोरियाचे जॉईन्ट चिफ ऑफ स्टाफ यांनी सांगितले. 

जून महिन्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन यांनी दोन्ही देशांच्या 'डिमीलिटराईज्ड' (लष्कर तैनात करण्यास परवानगी नसलेला सीमा भाग) भागामध्ये भेट दिली होती. त्यानंतर उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र डागण्याची ही पहिलीच घटना आहे. याआधी मे महिन्यात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती. 

Conclusion:
Last Updated : Jul 25, 2019, 12:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.