ETV Bharat / bharat

२०२१ पर्यंत पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेस मुक्त राज्य होईल - बाबुल सुप्रियो - mamata banerjee

'प. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २०१९ मध्ये अर्ध्यावर आली असून २०२१पर्यंत संपूर्णपणे नाहीशी होईल' असे खळबळजनक ट्वीट करत भाजपचे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला चढविला.

तृणमूल काँग्रेस २०२१ पर्यंत प. बंगालमधून नाहिसे होणार : बाबुल सुप्रियो
author img

By

Published : Jul 21, 2019, 1:21 PM IST

Updated : Jul 21, 2019, 3:12 PM IST

कोलकाता - भाजपचे केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी ट्विटरवरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस २०१९ आली आहे. २०२१ पर्यंत त्यांचा नामोनिशाण मिटेल, असे ट्विट त्यांनी केले आहे.

babul
तृणमूल काँग्रेस २०२१ पर्यंत प. बंगालमधून नाहिसे होणार : बाबुल सुप्रियो
मागील महिन्यातही सुप्रियो यांनी ' प. बंगालमधील सद्य स्थितीमुळे देशातच नव्हे तर जगभरात बंगाली लोकांची मान झुकत असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यावेळीही त्यांनी ममता सरकार २०२१ पर्यंत टिकणार नाही', असा विश्वास व्यक्त केला होता.

ममता बॅनर्जी प. बंगाल पोलीस आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा हिंसाचार पसरविण्यासाठी वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी वारंवार केला आहे. यापूर्वी, १३ जुलै रोजी भाजप नेते मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेस, काँग्रेस आणि माकपचे १०७ आमदार भाजपमध्ये प्रवेशकरण्याच्या तयारीत असल्याचे म्हटले होते.

भाजप प. बंगाल व इतर राज्यांमध्ये स्वत:चे सरकार स्थापन करण्याचा कट रचत असल्याचा आरोप तृणमूल काँग्रेस आणि इतर विरोधी पक्ष करत आहेत.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 21, 2019, 3:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.