ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM :रात्री वाजे वाजेपर्यंतच्या ठळक बातम्या... - महत्वाच्या घडामोडी

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

टॉप टेन
टॉप टेन
author img

By

Published : Sep 3, 2020, 3:50 PM IST

Updated : Sep 3, 2020, 10:59 PM IST

  • मुंबई - देशात आणि राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार थांबायचे नावाचे घेत नाही आहे. दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना आतापर्यंतच्या दिवसाच्या रुग्णवाढीमध्ये पुन्हा एकदा सर्वोच्च संख्या गाठत मागच्या २४ तासांत राज्यात १८ हजार १०५ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या ८ लाख ४३ हजार ८४४ झाली आहे. राज्यात २ लाख ५ हजार ४२८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आज राज्यात ३९१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून मृतांची संख्या २५ हजार ५८६ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर ३.०३ टक्के एवढा आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा - राज्यात कोरोना वाढीचा नवा उच्चांक: 18 हजारपेक्षा जास्त नव्या रुग्णांची नोंद, तर ३९१ जणांचा मृत्यू

  • नवी दिल्ली - २०२० हे वर्ष सुरू झाले तेव्हा कोणी अशी महामारी येईल याचा विचारही केला नव्हता. भारतातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदरही इतर देशांच्या तुलनेत कमी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. मोदी यांनी ‘भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम’ला (USISPF) संबोधित केले आहे. त्यावेळी ते बोलत होते.

हेही वाचा - 'भारत-अमेरिका स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम'ला पंतप्रधान मोदींनी केले संबोधित; म्हणाले...

  • मुंबई - राज्यातील विद्यापीठ आणि त्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू केल्या जाणार आहेत. तसेच या परीक्षांचे निकाल 31 ऑक्टोबरपर्यंत जाहीर केले जातील, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज राजभवन येथे दिली.राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज राजभवन येथे राज्यातील कुलगुरू आणि उच्च शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर सामंत यांनी ही माहिती दिली आहे.

हेही वाचा - अंतिम वर्षाच्या परीक्षांचं ठरलं..! ऑक्टोबरच्या सुरुवातीला परीक्षा, तर महिनाअखेरीस निकाल

  • लाहोर - पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि पाकिस्तान मुस्लिम लीग(एन) पक्षाचे नेते नवाज शरिफ यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. नवाज शरिफ यांच्या विरोधात भ्रष्टाचाराप्रकरणी पाकिस्तानात खटला सुरू आहे. दरम्यान, उपचारासाठी ते इंग्लडला गेले होते. मात्र, तेथून अद्याप माघारी आले नाहीत.

हेही वाचा - इंग्लंडमध्ये जाऊन बसलेल्या पाकच्या माजी पंतप्रधानांविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट

  • इस्लामाबाद - मृत्यूदंडाची शिक्षा झालेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना कायदेशीर मदतीसाठी वकील उपल्बध करून देण्यासंदर्भात आज इस्लामाबाद उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. दरम्यान, उच्च न्यायालयाने याप्रकरणी निर्णय दिला नसून येत्या 6 ऑक्टोंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. तसेच न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्यासाठी वकिल नेमण्याची आणखी एक संधी भारताला दिली आहे.

हेही वाचा - पाकचे 'पहिले पाढे पंचावन्न'; कुलभूषण जाधवांना वकील देण्यासंदर्भातील सुनावणी ढकलली पुढे

  • बंगळुरु - भारतीय अर्थव्यवस्था मंदीत सापडली असून एप्रिल ते जून या तिमाहीत देशाचा विकास दर उणे २३.९ टक्के नोंदवला आहे. बांधकाम, व्यापार, निर्मिती, पर्यटन, मनोरंजन यासह सर्वच क्षेत्रात मंदी आली आहे. कोरोना महामारी आणि त्यानंतर देशात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर अनेकांचे रोजगारही गेले आहेत. तर उद्योगधंदे अडचणीत सापडले आहेत. अर्थव्यवस्था डगमगली असतानाच विरोधी पक्ष आक्रमक झाले असून भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. सोशल मीडियावर राष्ट्रीय युवक काँग्रेसने #PMModi_RozgarDo ' पीएम मोदी रोजगार दो' हे अभियान सुरू केले आहे.

हेही वाचा - 'नो जॉब, नो वोट... मोदीजी रोजगार द्या'; ट्विटरवर युवक आक्रमक

  • अमरावती- गर्भवती महिला, महिलेच्या गर्भातील बाळ, नवजात बाळ, स्तनदा माता, आणि बाळाची वयाच्या 6 वर्षांपर्यंत काळजी घेऊन त्यांचे आरोग्य सुदृढ करण्यात अतिशय मोलाचा वाटा उचलण्याचे काम अंगणावाडी सेविका आणि मदतनीस करत असतात. मात्र, सध्या अंगणवाड्यांना विविध संकटांना सामोरे जावे लागत आहे. राष्ट्र निर्मितीच्या कामात महत्वाचा वाटा असणाऱ्या अंगणवाडी सेविका तटपुंज्या मानधनावर परिस्थितीशी संघर्ष काम करत असल्याचे चित्र अंगणवाड्यांमध्ये पाहायला मिळत आहे. अंगणवाडी मधील सोयींमध्ये सुधारणा करण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडी सेविकांद्वारे केली जात आहे.

हेही वाचा - स्पेशल : देशाचे भविष्य बळकट करणाऱ्या अंगणवाड्यांच्या समस्या सोडवण्याची मागणी

  • मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकार लपवालपवी करत असून, त्यांना कंगनाची का भीती वाटतेय, असा सवाल भाजप नेते राम कदम यांनी केला आहे. संजय राऊत आणि कंगना रनौत यांच्यामध्ये झालेल्या शाब्दिक चकमकीच्या पार्श्वभूमीवर कदम बोलत होते.

हेही वाचा - 'महाराष्ट्र सरकारला वाटतेय कंगनाची भीती'

  • नवी दिल्ली : भारत-चीन सीमावाद अजूनही मिटलेला नाही. नुकतेच चीनने लडाखमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर परिस्थिती आणखी संवेदशनशील झाली आहे. भारतीय लष्कर सतर्क झाले असून गृह मंत्रालयानेही आता इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलीस (ITBP) आणि सशस्त्र सीमा दलाला (SSB) सतर्कतेचा इशारा दिला असून सीमेवर अतिरिक्त सैन्य तैनात केल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे.

हेही वाचा - भारत-चीन नियंत्रण रेषेवर तणाव कायम; आयटीबीपी, एसएसबीला सतर्कतेचा इशारा

  • मुंबई - आयपीएल सुरू होण्यासाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. असे असताना देखील बीसीसीआयने अद्याप वेळापत्रकाची घोषणा केलेली नाही. यामुळे विविध चर्चांना ऊत आला आहे. याविषयी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी माहिती दिली. वेळापत्रकाचे काम आज (गुरुवार) पूर्ण होईल, त्यानंतर उद्या (शुक्रवार) पर्यंत त्याची घोषणा केली जाईल, असे गांगुली यांनी सांगितले.

हेही वाचा - आयपीएल २०२० च्या वेळापत्रकाबाबत सौरव गांगुली म्हणाले...

Last Updated : Sep 3, 2020, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.