ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!

author img

By

Published : May 25, 2020, 4:13 PM IST

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

दुपारी चारच्या ठळक बातम्या!
दुपारी चारच्या ठळक बातम्या!

सटाणा (नाशिक ) - बागलाण तालुक्यात प्रेमीयुगुलाने आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. रवींद्र पोपट पवार (वय २२) व पूजा बंडू गांगुर्डे (वय १८) रा. सावरगाव अशी आत्महत्या केलेल्या युगुलांची नावे आहेत. ही घटना पेठवे गावात घडली.

सविस्तर वाचा - धक्कादायक..! हळदीच्या दिवशीच तरुणाची प्रेयसीसोबत गळफास घेऊन आत्महत्या

मुंबई - काँग्रेसचे नेते व सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे रविवारी समोर आले. यानंतर आता त्यांना पुढील उपचारासाठी नांदेडहून मुंबईला हलवण्यात येत आहे. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती अथवा इतर मोठ्या खासगी रुग्णालयात उपचार केले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाग्रस्त अशोक चव्हाणांवर मुंबईत होणार उपचार

पुणे - कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत उडी मारून एका मातेने चिमुकल्या मुलीला कंबरेला बांधून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी सायंकाळी घडली. आज दुपारी मायलेकींचा मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. सपना कसबे असे मृत महिलेचे नाव आहे.

सविस्तर वाचा - चिमुकलीला कमरेला बांधून आईची भीमा नदीत आत्महत्या; परिसरात हळहळ

जगभरात कोरोनाचे संक्रमण वाढत आहेत. अशा परिस्थितीत सर्वांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्याची गरज आहे. म्हणून रोगप्रतिकारकशक्ती नेमकी कशी वाढवायची, नागरिकांनी नेमकी काय खबरदारी घ्यावी, यासंदर्भात ईटीव्ही भारतने मुंबईतील बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी यांची विशेष मुलाखत घेतली. पाहूयात ते काय म्हणतायेत...

सविस्तर वाचा - रोगप्रतिकारकशक्ती नेमकी कशी ठेवावी? पहा, काय म्हणतायेत बालरोगतज्ज्ञ डॉ. हेमंत जोशी

शिर्डी - लॉकडाऊनमुळे बंद असलेली विमानसेवा देशांतर्गत सुरू करण्याची केंद्र सरकारने घोषणा केली. त्यानंतर शिर्डी आंतराष्ट्रीय विमानतळावर सर्व प्राथमिक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. इंडिगोने शिर्डी-हैदराबाद ही विमानसेवा सुरू करण्याची तयारी देखील दाखवली. त्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन, पोलीस आणि विमानतळ प्रशासनाची बैठक देखील पार पडली होती.

सविस्तर वाचा - हैदराबादवरुन शिर्डीला येणारे इंडिगो एअर लाईन्सचे विमान रद्द; 29 प्रवासी करणार होते प्रवास

नवी दिल्ली - सोने आयातीत जगात आघाडीवर असलेल्या भारतात सोन्याच्या आयातीत कमालीची घसरण झाली आहे. सलग पाचव्या महिन्यात सोन्याची आयात १०० टक्क्यांनी घसरली आहे.

सविस्तर वाचा - सोन्याची आयात 'फिक्कट'; सलग पाचव्या महिन्यात १०० टक्क्यांची घसरण

रांची - स्थलांतरीत कामगारांना घेऊन जाणारी एक बस दरीत कोसळल्यामुळे ४० जण जखमी झाले आहेत. ही बस मुंबईहून पश्चिम बंगालमधील वर्धमान जिल्ह्याकडे निघाली होती. रांचीमधील सिकिदिरी घाटामध्ये ही दुर्घटना घडली.

सविस्तर वाचा - स्थलांतरीत मजूरांना नेणारी बस दरीत कोसळली; ४० जखमी..

नवी दिल्ली - भारतीय क्रीडा प्राधिकरणाने खेलो इंडियाशी संबंधित 2749 खेळाडूंना 8.25 कोटी रुपये भत्ता म्हणून जाहीर केला आहे. हे भत्ते 2020-21 च्या पहिल्या तिमाहीतील आहेत. "22 मे रोजी खेळाडूंच्या बँक खात्यात हा निधी पाठवण्यात आला. एकूण 2893 खेळाडूंना ही रक्कम दिली जाईल.

सविस्तर वाचा - खेलो इंडियाच्या 2749 खेळाडूंसाठी निधी जाहीर

मुंबई - भारतीय हॉकी संघातील महान खेळाडू बलबीर सिंग सिनिअर यांचे सोमवारी निधन झाले. वयाच्या 95 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाल्याचे अभिनेता अक्षय कुमारने म्हटले आहे. अक्षयने ट्विटरवर सिंग यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला आहे.

सविस्तर वाचा - बलबीर सिंग एक उत्तम व्यक्तिमत्व, अक्षयने व्यक्त केलं दुःख

मुंबई - हॉलिवूड अभिनेत्री किम कार्दशियन नेहमीच आपल्या निरनिराळ्या फोटोंमुळे चर्चेत असते. रविवारी किम आणि तिचा रॅपर पती कान्ये वेस्ट यांच्या लग्नाचा सहावा वाढदिवस होता. यानिमित्त किमने पतीसोबतचा आपला एक खास फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला.

सविस्तर वाचा - अभिनेत्री किमच्या लग्नाला सहा वर्ष पूर्ण, शेअर केला पतीसोबतचा फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.