ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!

author img

By

Published : May 24, 2020, 4:09 PM IST

Updated : May 24, 2020, 4:15 PM IST

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रांतील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

top ten news stories at four PM
Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!
  • मुंबई - काही जण म्हणतात पॅकेज का नाही दिले? मात्र, आतापर्यंत किती पॅकेज दिली? त्यांचे काय झाले? पॅकेज दिले जाईलच, पण अन्न मिळणे, उपचार मिळणे हे पॅकेजपेक्षाही मोठी गोष्ट आहे, असा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना सुनावले. त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी संवाद साधला.

सविस्तर वाचा : पॅकेजपेक्षा जनतेला अन्न, आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

  • नवी दिल्ली - कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक भारतीय नागरिक परदेशात अडकले आहेत. त्यांना परत आणण्यासाठी केंद्र सरकारने मोहीम सुरू केली आहे. लॉकडाऊनमुळे पाकिस्तानमध्ये अडकलेले 300 भारतीय नागरिक लवकरच भारतात परतणार आहेत.

सविस्तर वाचा - पाकिस्तानात अडकलेले 300 भारतीय लवकरच परतणार; महाराष्ट्राच्या नागरिकांचाही समावेश

  • मुंबई- रमजान ईद सोमवारी साजरा होणार आहे. ईदची सामूहिक नमाज सोशल डिस्टनसिंग पाळून अदा करू द्यावी, अशी मागणी मुस्लीम बांधवांकडून होत होती. मात्र, ईदची नमाज घरातच अदा करावी, असे आवाहन अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले आहे.

सविस्तर वाचा : रमजान ईदची नमाज घरातच अदा करा, मुस्लीम बांधवांना नवाब मलिकांचे आवाहन

  • नवी दिल्ली - सरकारी वीज कंपनीमधील कर्मचारी व अभियंते हे 1 जूनला 'निषेध दिन' पाळणार आहेत. सरकारने वीज कंपनीचे खासगीकरण करण्याचा निर्णय घेतला असून त्याचा निषेध करणार असल्याचे ऑल इंडिया पॉवर इंजिनिअर्स फेडरेशनने (एआयपीईएफ) म्हटले आहे.

सविस्तर वाचा : वीज कंपनीतील कर्मचारी 1 जूनला पाळणार 'निषेध दिन'; 'हे' आहे कारण

  • रत्नागिरी - जिल्हा रुग्णालयात स्वॅब तपासणी लॅब उभारण्यासाठी 1 कोटी 7 लाख रुपये निधी देण्याचा निर्णय शासनाने केला असून लवकरच रत्नागिरीत अत्याधुनिक लॅब सुरू होईल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. येत्या 15 दिवसांत ही लॅब सुरू झाल्यास कोरोना स्वॅब अहवाल रत्नागिरीतच मिळणे शक्य होणार आहे.

सविस्तर वाचा : 15 दिवसांत जिल्ह्यात स्वॅब तपासणी लॅब : उदय सामंत

  • मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊननंतर आता स्थलांतराचा गंभीर परिणाम अत्यावश्यक अशा औषध वितरण व्यवस्थेवरही होऊ लागला आहे. देशातील 40 टक्के औषधांची गोदामे भिंवडी शहरात आहेत. येथील फार्मा क्षेत्रात काम करणारे 60 ते 70 टक्के मजूर गावी परतले आहेत. त्यामुळे येथे सध्या 30 टक्केच व्यवहार सुरू असून मुंबईत औषधे पोहोचायला 10 ते 12 दिवस लागत आहेत.

सविस्तर वाचा : मुंबईकरांनो, अत्यावश्यक औषधे खरेदी करून ठेवा! 60-70 टक्के मजूर परतले गावी

  • नांदेड - बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराजांची निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना उमरी तालुक्यातील नागठाणा बु. येथे शनिवारी रात्री दीड वाजताच्या दरम्यान घडली. या घटनेने भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा : दुहेरी हत्याकांडाने नांदेड हादरले; बाल तपस्वी रुद्र पशुपतीनाथ महाराजांचा गळा दाबून खून

  • अमरावती - जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील पिंपरी गावातील एका शेतमजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आत्महत्या केलेल्या मजुराला त्याच्याच गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन केले होते. शुक्रवारी रात्री त्याने एका झाडाला साडी बांधून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर अंगारे (वय 32) असे आत्महत्या करणाऱ्या मजुराचे नाव आहे.

सविस्तर वाचा : धक्कादायक : विलगीकरणात ठेवलेल्या मजुराची गळफास घेऊन आत्महत्या

  • सांगली - कर्नाटकातील चिरहट्टी येथे कोळसा भट्टीवर काम करणारे 101 मजूर कर्नाटक प्रशासनाने दखल न घेतल्याने खासगी वाहनाने जत हद्दीतील बसर्गी गावात आले. गुरूवारी मध्यरात्री ते बसर्गीत आल्यानंतर याबाबतची माहिती तहसीलदारांना देण्यात आली. त्यानंतर हे सर्व मजूर रायगड, पाली अहमदनगर येथील असून त्यांना सुखरूप आपल्या गावी पोहोचवले जाणार आहेत.

सविस्तर वाचा : कर्नाटकातील कोळसा भट्टीवरील मजुरांना मध्यरात्री सोडले महाराष्ट्राच्या सीमेवर; त्यानंतर उपाशीपोटी मजूर निघाले. . .

  • नवी दिल्ली - अपुरे मनुष्यबळ असल्याने पार्ले कंपनीला उत्पादनात अडचणी येत आहेत. ग्रीन आणि ऑरेंज क्षेत्रातील अन्न उत्पादक कंपन्यांसाठी कर्मचारी संख्येची अट शिथिल करावी, अशी मागणी पार्ले कंपनीने सरकारकडे केली आहे.

सविस्तर वाचा : पार्ले कंपनीसमोर अपुऱ्या मनुष्यबळाचे आव्हान; सरकारकडे 'ही' केली मागणी

Last Updated : May 24, 2020, 4:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.