ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

Top ten news stories at four PM
Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : May 15, 2020, 4:17 PM IST

  • मुंबई - कोरोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील अभूतपूर्व लॉकडाऊनने साखर उद्योगासमोर निर्माण झालेल्या संकटातून मुक्त करण्यासाठी आपण तातडीने हस्तक्षेप करत भरीव मदत करावी, अशी विनंती करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.

सविस्तर वाचा - लॉकडाऊनमुळे साखर उद्योगासमोरील संकटातून सावरण्यासाठी केंद्राने भरीव मदत करावी - शरद पवार

  • सांगली - शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, खरिपासाठी तात्काळ कर्ज द्या, यासह विविध मागण्यांसाठी आज माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आंदोलन करण्यात आले आहे. 'माझ अंगण हेच रणांगण' या आंदोलनाच्या माध्यमातून सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर शेतकरी प्रश्नावर जोरदार निशाणा साधत, इशारा दिला आहे. आपल्या कुटुंबासह अंगणात उभे राहून खोत यांनी हे आंदोलन केले.

सविस्तर वाचा - तिरडीवर झोपलेल्या सरकारने जागे व्हावे, सदाभाऊ खोतांचा आंदोलनातून सरकारला इशारा

  • कोल्हापूर - जिल्ह्यातील नागरिकांनी चंद्रकांत पाटील यांना मोठे केले. असे असताना 'ते' विविध वक्तव्य करुन राजकारण करत आहेत. कोल्हापूरची जनता कोरोनाच्या काळात मेली का जगली, हे पाहायला सुद्धा 'ते' कोल्हापुरात आले नाहीत, अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर केली.

सविस्तर वाचा - कोल्हापूरची जनता ठीक आहे, का मेली हे पाहायला 'ते' आले नाहीत; मंत्री मुश्रीफ यांचा चंद्रकांत पाटलांना टोला

  • यवतमाळ - कोरोनामुळे सुरू असलेल्या संचारबंदीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. रक्त आटवून पिकवलेल्या भाजीपाल्यास सध्या पिकाला उठाव नाही. माल नेण्यासाठी वाहन वेळेत उपलब्ध होऊ शकले नाही. परिणामी कोबी, वांगे, बरबटी, काकडी आदी भाजीपाला शेतातच सडला. पिकांची दुर्दशा बघून रुई येथील शेतकऱ्याने उभ्या पिकात चरण्यासाठी जनावरांना सोडून रोटाव्हेटर फिरवले.

सविस्तर वाचा - रक्त आटवून पिकवलेला भाजीपाला संचारबंदीमुळे शेतात सडला; संतप्त शेतकऱ्याने पिकात सोडली जनावरे

  • रायगड - मुंबईहून चालत निघालेल्या चाकरमान्याचा पेण तालुक्यातील जिते गावाजवळ वाटेतच मृत्यू झाल्याची घटना घडली. मुंबई-गोवा महामार्गावर संबंधित प्रकार घडला असून लॉकडाऊनच्या काळातील ही जिल्ह्यातील तिसरी घटना आहे. मोतीराम जाधव (वय-43) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कांदिवली येथून श्रीवर्धनकडे हे कुटूंब स्वत:च्या गावाकडे निघाले होते.

सविस्तर वाचा - अखेर तो रस्त्यात कोसळला...लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील तिसरी घटना

  • लखनऊ : मुंबईहून उत्तर प्रदेशला जाणाऱ्या एका ट्रकचा राज्याच्या बहराइच जिल्ह्यामध्ये अपघात झाला आहे. चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा भरधाव ट्रक थेट झाडाला जाऊन धडकला. या ट्रकमधून स्थलांतरीत कामगार आपापल्या घरी परत निघाले होते. या अपघातात एका महिला कामगाराचा मृत्यू झाला असून, काही कामगार जखमी झाले आहेत.

सविस्तर वाचा - बहराईचमध्ये स्थलांतरीत मजूरांच्या ट्रकला अपघात; दोन ठार

  • बंगळुरू - केंद्र सरकारने दुसऱ्या टप्प्यातील वित्तीय प्रोत्साहन पॅकेजमध्ये स्थलांतरित कामगार, लहान शेतकरी आणि गरिबांना संमिश्र स्थान दिले. मात्र, या पॅकेजमध्ये बटईने काम करणाऱ्या शेतकऱ्यांना (Tenant Farmers )कोणताही दिलासा देण्यात आला नाही.

सविस्तर वाचा - केंद्रीय अर्थमंत्र्यांच्या पॅकेजमध्ये 'हा' घटक पुन्हा राहिला वंचित

  • धुळे - गर्भवती महिलेस आरोग्य केंद्रापर्यंत पोहोचविण्यासाठी नागरिकांना चक्क बांबूंचा आधार घेऊन खांद्यावरती झोळी करून तीन किलोमीटरपर्यंत न्यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे अंतर कापल्यानंतर या गर्भवती महिलेस अखेर रुग्णवाहिका नशीब आली. त्यानंतर तिला बोराडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले व महिलेची प्रसूती झाली.

सविस्तर वाचा - गर्भवती महिलेस प्रसूतीपेक्षाही जास्त झोळीतून केलेल्या प्रवासाच्या कळा, तीन किलोमीटर खांद्यावरून पोहोचवले रुग्णालयात

  • नवी दिल्ली - जी २० राष्ट्रसमुहातील देशांनी जागतिक व्यापार संघटनेच्या करारांतर्गत बौद्धिक संपदा अधिकाराचे लवचिकपणे पालन करावे, अशी भारताने मागणी केली आहे. त्यामधून आवश्यक औषधे, उपचार आणि लसी यांच्या किमती परवडणाऱ्या दरात ठेवण्याची सदस्य देशांनी खात्री द्यावी, असेही भारताने म्हटले आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाच्या संकटात भारताने जी २० राष्ट्रसमुहाकडे 'ही' केली मागणी

  • वॉशिंग्टन - अ‌ॅपल कंपनी चीनमधून भारतात उत्पादन प्रकल्प हलविण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अ‌ॅपलला अतिरिक्त कर लावण्याचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा - चीनमधून भारतात येणाऱ्या अ‌ॅपलला डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दिला इशारा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.