ETV Bharat / bharat

Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!

author img

By

Published : May 11, 2020, 4:12 PM IST

राज्यासह देश-विदेश आणि क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील काही ठळक घडामोडी, वाचा एका क्लिकवर...

top ten news stories at four PM
Top 10 @ 4 PM : दुपारी चारच्या ठळक बातम्या!
  • ठाणे - कोरोनाग्रस्तांवर उपचार करण्यासाठी गावात ये-जा करणाऱ्या एका कोरोना योद्धावर बहिष्कार न टाकणाऱ्या कुटूंबावर धारधार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची धक्कदायक घटना घडली आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील कसारा नजीक असलेल्या मोखावणे गावात घडली आहे. याप्रकरणी कसारा पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील 32 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा - धक्कादायक ! कोरोना योद्धावर बहिष्कार न टाकणाऱ्या कुटूंबावर धारधार शस्त्राने हल्ला

  • मुंबई - विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी आज (सोमवार) अर्ज भरण्याची अखेरची मुदत आहे. त्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीसह भाजप आणि इतर पक्षांकडून तब्बल २२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. यात सर्वाधिक अर्ज हे पर्यायी उमेदवार म्हणून भरण्यात आले आहेत. तसेच अपक्ष उमेदवारांची संख्या देखील लक्षणीय असल्याचे सांगण्यात येत आहे.

सविस्तर वाचा - विधानपरिषद निवडणूक : 9 जागांसाठी आत्तापर्यंत तब्बल २२ अर्ज दाखल

  • वॉशिंग्टन डी. सी- कोरोना महामारीमुळे जागतिक मंदी आली आहे. अशातच अमेरिकेच्या फेडरल बँकेतील अधिकाऱ्याने रोजगाराची स्थिती आणखी गंभीर होणार असल्याचा इशारा दिली आहे. एप्रिल महिन्यापासून २ कोटी लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. मात्र, रोजगाराची स्थिती यापेक्षा गंभीर होणार असल्याचे फेडरल बँकेच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे.

सविस्तर वाचा - 'नोकऱ्यांबाबतचे आणखीन वाईट दिवस अजून येणे बाकी आहेत'

  • मनमाड (नाशिक) -कोरोनासारख्या महामारीत आपला जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांवर हल्ले सुरूच आहेत. नांदगाव तालुक्यातील नांदगाव-चाळीसगाव चेक पोष्टवर कर्तव्यावर असरणाऱ्या २ पोलिसांवर पोलीस पाटील यांच्यासह एका पत्रकाराने टोळक्यासह येऊन मारहाण केली. तसेच त्यांच्या अंगावरील कपडे फाडण्याचा प्रकार रविवारी रात्री घडला. याप्रकरणी हल्लेखोरांविरोधात नांदगाव पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा - नातेवाईकांच्या वाहनांची तपासणी केल्याच्या रागातून जमावाच्या मदतीने पत्रकाराची पोलिसांना मारहाण

  • मुंबई - लॉकडाऊनच्या काळात ठप्प पडलेल्या उद्योग विश्वासाठी अतिशय महत्वाची बातमी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू असून सहा लाख कामगार रुजू झाले असल्याचे देसाई यांनी सांगितले. मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर, पुणेच्या वतीने आयोजित कार्यक्रमात आज उद्योगमंत्री बोलत होते.

सविस्तर वाचा - दिलासादायक.. राज्यात २५ हजार कंपन्यांचे उत्पादन सुरू, सहा लाख कामगार रुजू - उद्योगमंत्री

  • बीड - राज्यातील आशा वर्कर व गटप्रवर्तक हे अत्यंत तुटपुंजा मानधनात काम करत आहेत. आता शासनाने मानधन वाढवून द्यावे, या मागणीसाठी आशा वर्कर आणि गटप्रवर्तक आवाज उठवणार आहेत. 11 ते 13 मे दरम्यान काळ्या फिती लावून हे सर्व कामगार काम करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक महासंघाचे जिल्हाध्यक्ष सचिन आंधळे यांनी सांगितले.

सविस्तर वाचा - वाढीव मानधनासाठी आशा वर्कर्सचे आंदोलन, काळ्या फिती लावून करणार काम

  • मुंबई - टी सिरीजध्ये काम करणारा व्यक्ती कोरोनाबाधित झाल्याने बृहन्मुंबई म्युन्सिपल कार्पोरेशन ( बीएमसी ) ने टी-सिरीजची इमारत सील केली आहे.

सविस्तर वाचा - 'टी सिरीज' मध्ये कार्यरत कामगाराला कोरोनाची लागण, बीएमसीकडून कार्यालयाची इमारत सील

  • नवी दिल्ली - टोकियो ऑलिम्पिक कोटा जिंकणारा युवा नेमबाज रुद्रांक्ष पाटील आणि यशस्विनी सिंग यांनी तिसऱ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन नेमबाजी स्पर्धेत अव्वल स्थान मिळवले. या दोघांनी अनुक्रमे 10 मीटर एअर रायफल आणि 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये ही कामगिरी केली.

सविस्तर वाचा - महाराष्ट्राच्या रुद्रांक्ष पाटीलचा विश्वविक्रम, पण..

  • नवी दिल्ली - पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने वीरेंद्र सेहवागच्या 'बाप-बाप होता है, बेटा-बेटा होता है' घटनेला फेटाळून लावले आहे. मुलतान कसोटीदरम्यान असा कोणताही किस्सा घडला नसल्याचे अख्तरने स्पष्ट केले.

सविस्तर वाचा - सेहवाग खोटारडा! असं काही घडलंच नव्हतं - शोएब अख्तर

  • काबूल - अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरात आज(सोमवारी) चार बॉम्बस्फोट झाले. शहरातील ताहीया मस्कान भागात हे स्फोट झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सकाळी ७.४५ ते ९ च्या दरम्यान स्फोट झाले. या हल्ल्याची सविस्तर माहिती हाती आली नाही.

सविस्तर वाचा - काबूल शहरात चार बॉम्बस्फोट; सुरक्षा मुख्यालय उडवून देण्याचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.