मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी खास बातचित केली. यात त्यांनी अनेक मुद्यांवर भाष्य केले. टाळेबंदीमुळे लग्न सोहळे रखडले आहेत. पण, यावर इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. एका क्रिकेटपटूने कोरोनावर मात केली आहे. या घटनांसह टॉप-१० घडामोडी वाचा सविस्तर...
- राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ईटीव्ही भारतशी बातचीत केली आहे. कर्जत जामखेडमध्ये कोरोना कसा आटोक्यात आणला? तसेच राज्यातील तरुणाईसंदर्भात रोहित यांचे विचार काय आहेत? याबाबत रोहित यांनी ईटीव्ही भारतशी मनमोकळेपणाने संवाद साधलाय. पाहा रोहित पवार यांची ही विशेष मुलाखत...
पाहा काय म्हणाले रोहित पवार.. 'राज्यातील युवकांना हवं फक्त हक्काचं व्यासपीठ' आमदार रोहीत पवारांची ईटीव्ही भारतला विशेष मुलाखत
- मुंबई - टाळेबंदीमुळे लग्न सोहळे रखडले आहेत. याचा फटका कॅटरिंग उद्योग, विवाह हॉल व्यवस्थापन यांना बसू लागला आहे. यावर उपाय म्हणून इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्यांनी नामी शक्कल शोधून काढली आहे. त्यानुसार त्यांनी तयारी सुरू केली आहे.
वाचा काय आहे शक्कल - लग्न सोहळे पार पाडण्यासाठी नामी शक्कल, इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने शोधला मार्ग
- वर्धा - आईने 200 रुपये न दिल्याने रागाच्या भरात गळफास घेवून तरुणाने आत्महत्या केली. ही घटना पंजाब कॉलनी येथे गुरुवारी सायंकाळी घडली. सर्वेश इंगळे असे 19 वर्षीय तरुणाचे नाव आहे. रामनगर पोलिसात घटनेची नोंद असून तपास सुरू आहे.
सविस्तर वाचा - धक्कादायक; आईने 200 रुपये न दिल्याच्या रागातून मुलाने घेतला गळफास
- मुंबई - वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी राज्यातील वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या परीक्षा १५ जुलैच्यादरम्यान घेण्याची तयारी असून त्यासाठीचा प्रस्ताव आरोग्य विज्ञान विद्यापीठाने दिला असल्याची माहिती राज्यपालांना दिली. परंतु, आज या परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यामुळे, या परीक्षा आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाचा सविस्तर - वैद्यकीय परीक्षा आणखी लांबणीवर..! एमसीआयने दिल्या नवीन मार्गदर्शक सूचना
- जळगाव - कोरोना विषाणूचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून राज्य सरकारने शाळा सुरू करण्याऐवजी ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी जुलै महिन्यापासून करण्याच्या हालचाली सुरू आहेत. मात्र, शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागातूनही या निर्णयाला तीव्र विरोध होत असल्याचे पाहायला मिळत आहे. अज्ञानी पालक, स्मार्टफोन, इंटरनेट तसेच वीज अशा संसाधनांचा अभाव असल्यामुळे सरकारचा हा निर्णय फसण्याची शक्यता आहे. या निर्णयाचा सरकारने पुनर्विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
सविस्तर वाचा - ग्रामीण भागात 'ऑनलाईन शिक्षण' दिवास्वप्नच; स्मार्टफोन, इंटरनेटची पालकांपुढे समस्या
- नवी दिल्ली - भारतासाठी मोस्ट वॉन्टेड असलेला कुख्यात दहशतवादी दाऊद इब्राईम आणि त्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाली असून त्याला पाकिस्तानमधल्या कराची शहरातील लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती माध्यमांमध्ये येत आहे. गुप्तचर विभागानेही यासंबधी माहिती दिली होती. मात्र, दाऊदला कोरोनाची लागण झाली नसल्याचे दाऊदचा भाऊ अनिस इब्राईमने आयएनएसशी बोलताना सांगितले.
सविस्तर वाचा - दाऊदला कोरोनाची लागण झाली नाही, भावाने दिली फोनवरून माहिती
- चंदीगड - हरियाणामधील भाजप नेत्या आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट यांनी एका सरकारी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये त्या अधिकाऱ्याला चपलेने मारताना दिसून येत आहेत.
वाचा सविस्तर - भाजप नेत्याची अधिकाऱ्याला चपलेने मारहाण; व्हिडिओ व्हायरल..
- मुंबई - लॉकडाऊनच्या काळात सोनू सूदने आत्तापर्यंत बर्याच प्रवासी कामगारांना त्यांच्या मूळ गावी पोहोचवले. यामुळे स्थलांतरित मजूरांचा प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला काही अंशी मदत झाली. आता पुन्हा 5 जून रोजी संध्याकाळी अभिनेता सोनूने वडाळा टीटी येथून 220 लोकांसाठी बसेसची व्यवस्था केली.
सविस्तर वाचा - सोनू सूदची स्थलांतरित कामगारांना मदत, मुंबईतून आणखी पाच बस रवाना
- नवी दिल्ली - भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. युवराजने रोहित शर्मासमवेत इन्स्टाग्रामवर बोलताना युजवेंद्र चहलबाबत एक जातीवाचक टिप्पणी केली. त्यानंतर, नेटकऱ्यांनी युवराजकडून माफीची मागणी केली.
सविस्तर वाचा - युवराज सिंगवर गुन्हा दाखल, अटक होण्याची शक्यता
- इस्लामाबाद - पाकिस्तानचा माजी सलामीवीर तौफीक उमर याने कोरोनावर मात केली आहे. उमरला गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानंतर त्याला घरामध्येच क्वारंटाइन करण्यात आले होते. त्याच्यावर उपचारही सुरु होते. या उपचारांना आता त्याचा वैद्यकिय अहवाल निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, कोरोनावर मात केल्यानंतर उमरने लोकांना स्वतःची काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
सविस्तर वाचा -गुड न्यूज..! क्रिकेटपटूची कोरोनावर मात