- मुंबई- बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपाल याची 2 वेळा नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोकडून (NCB) चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर या संदर्भात अधिक तपास करण्यासाठी अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आलेले आहे. बुधवारी सकाळी 11 वाजता अर्जुन रामपालची बहिन कोमल हिला एनसीबी कार्यालयमध्ये चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.
सविस्तर वाचा- अभिनेता अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीचे समन्स
- मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 14 हजार कोटी रुपयांचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्याविरोधात फरार आर्थिक गुन्हेगार म्हणून कारवाई केली जात आहे. ईडी कडून यासंदर्भात नीरव मोदी याच्या विरोधात कारवाई केली जात असताना, नीरव मोदी याची बहिण व तिचा पती यांनी विशेष न्यायालयामध्ये नीरव मोदी विरोधात याचिका दाखल केली आहे. पीएनबी बँक घोटाळा प्रकरणी नीरव मोदी पासून आम्हाला लांब ठेवण्यात यावे, यासाठी आम्ही सर्व प्रकारची मदत तपास यंत्रणांना करण्यासाठी तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या संदर्भातील महत्त्वाचे पुरावे देण्यासाठी त्यांनी तयारी दर्शविली आहे. नीरव मोदीची बहिण पूर्वी मेहता व तिचा पती मयांक मेहता यांनी ही याचिका ईडी विशेष न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे.
सविस्तर वाचा- नीरव मोदीच्या विरोधात त्याच्या बहिणीसह भावोजी देणार साक्ष
- रायगड - परीक्षेत नापास करेन आणि आईची नोकरी घालवेन, अशी धमकी देत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकावर माणगाव पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माणगाव पोलिसांनी या प्रकरणात शिक्षक मदन वानखेडे याला अटक केली आहे. मदन वानखेडे हा जिल्हा परिषद शाळेवर शिक्षक आहे. दरम्यान, शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी ही घटना आहे.
सविस्तर वाचा- परीक्षेत नापास करेन... धमकी देत शिक्षकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
- पुणे - राज्यात सध्या औरंगाबाद शहाराचे नामांतर संभाजीनगर असे करण्यावरून राजकारण तापू लागले आहे. यास काँग्रेससह अन्य काही पक्ष आणि संघटनांकडून विरोध होत आहे. मात्र, हा वाद सुरू असतानाचा आणखी एक नामांतराची मागणी पुढे आली आहे. ती म्हणजे राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहराचे नाव बदलण्याची मागणी होय. राष्ट्रमाता जिजाऊंनी बेचिराख झालेल्या पुण्याला वसवले आहे. त्या पुण्याला जिजाऊंचं नाव देऊन पुण्याचे 'जिजापूर' असं नामांतर करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे. त्यामुळे नव्या चर्चेला तोंड फुटले आहे.
सविस्तर वाचा- जिजामाता यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी म्हणजे पुण्यनगरी...
- यवतमाळ - पीक कर्जावरील व्याजाच्या योजनेत शासनाने महत्वपूर्ण बदल केला आहे. आता कर्जासह व्याजाची वसुली बँका शेतकऱ्यांकडून करणार आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनाकडून यथावकाश या व्याजाची रक्कम संबंधित शेतकऱ्याच्या बँक खात्यात जमा होणार आहे. शासनाने ही पद्धत डीबीटी (Direct Benefit Transfer) योजनेच्या अंतर्गत घेतली आहे.
सविस्तर वाचा- आधी पीक कर्जाचे व्याज भरा, नंतर शासन देणार थेट भरपाई
- मुंबई - केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ४० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र, मात्र, शेतकरी नेत्यांनी सरकारला प्रत्येक बैठकीत ठणकावून सांगितले आहे की, आम्हाला कृषी कायद्यात बदल नको. कायदे मागे घेणार असाल तरच आंदोलन संपेल. मात्र, अहंकाराने पेटलेले भाजपचे मोदी सरकार बिटिशांप्रमाणे आंदोलक शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवून मारत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून मधल्या काळात ‘बैठक-बैठक’ खेळण्याचा दमदार खेळ सुरू असल्याची घणाघाती टीका शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
सविस्तर वाचा- बैठकांचा खेळ! अंहकाराने पेटलेल्या भाजप सरकारला आंदोलन चिघळवत ठेवायचेय
- सांगली - महापालिका प्रशासनामध्ये वेगवेगळे विभाग असतात आणि या विभागाच्या माध्यमातून नागरी सुविधा पुरवण्या बरोबर शहराचा विकास साधला जातो. या सर्व विभागांचा समन्वय महत्त्वपूर्ण भाग असतो आणि सांगली महापालिका प्रशासनाकडून शहराचा विकास साधताना प्रत्येक विभागाशी समन्वय साधला जात आहे.
सविस्तर वाचा- वेगवेगळ्या विभागाच्या समन्वयातून पालिका प्रशासनाकडून होतोय शहराचा विकास
- भारत-नागा शांतता बोलण्यासांठी सरकारतर्फे मध्यस्थ म्हणून काम पहाणारे आरएन रवी यांची राज्यपालपदी २० जुलै २०१९ रोजी करण्यात आलेली नियुक्ती आणि ५ ऑगस्ट रोजी घटनेचा अनुच्छेद ३७० आणि ३५ अ बरखास्त करण्यात आल्यामुळे, नागा शांतता बोलण्यांबाबतचा पुढाकार हा अवघड अशा उंच कड्याकडे जात आहे. नागा घटना आणि ध्वजाबाबतच्या प्रश्नांवर तडजोड करण्यास किंवा मान्य करण्यास नकार देण्यात आल्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की, जेथे शांतता प्रक्रिया ही फक्त एका अंतिम मुदतीकडून (३१ ऑक्टोबर २०१९ ही पहिली मुदत आणि सप्टेंबर २०२० ही दुसरी तारिख जाहीर केली होती) दुसऱ्या अंतिम मुदतीकडे जात त्यावरच तग धरून आहे. १ डिसेंबर २०२० रोजी आर एन रवी यांनी आपल्या राज्यपालपदावरून केलेल्या भाषणात, स्वतंत्र नागा ध्वज आणि घटनेची मागणी फेटाळून लावली होती आणि केवळ अतिआशावादी लोकांनाच यातून सकारात्मक परिणाम निघेल, अशी अजूनही आशा वाटते.
सविस्तर वाचा- नागांशी बोलणी फिसकटली तर परिणाम कडवट होतील
- जयपूर- राजस्थमधील श्रीगांगानगरातली सूरतगढमध्ये मंगळवारी रात्री ८.१५ वाजता हवाईदलाचे मिग २१ लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. खराब हवामानामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती हवाईदलाकडून देण्यात आली. सूरतगडच्या विमानतळाजवळ हा अपघात झाला असून सुदैवाने वैमानिकाला वाचवण्यात यश आले आहे. हवाईदलाने या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
सविस्तर वाचा- हवाईदलाचे मिग-२९ अपघातग्रस्त; वैमानिकाला वाचवण्यात यश
- मुंबई - केंद्र सरकारच्या नव्या तीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या ४० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र, मात्र, शेतकरी नेत्यांनी सरकारला प्रत्येक बैठकीत ठणकावून सांगितले आहे की, आम्हाला कृषी कायद्यात बदल नको. कायदे मागे घेणार असाल तरच आंदोलन संपेल. मात्र, अहंकाराने पेटलेले भाजपचे मोदी सरकार बिटिशांप्रमाणे आंदोलक शेतकऱ्यांना देशद्रोही ठरवून मारत आहे. मात्र, केंद्र सरकारकडून मधल्या काळात ‘बैठक-बैठक’ खेळण्याचा दमदार खेळ सुरू असल्याची घणाघाती टीका शिवसेनेने मुखपत्र सामनाच्या अग्रलेखातून केली आहे.
सविस्तर वाचा- बैठकांचा खेळ! अंहकाराने पेटलेल्या भाजप सरकारला आंदोलन चिघळवत ठेवायचेय