ETV Bharat / bharat

Top 10 @ 1 PM : दुपारी एक वाजेपर्यंतच्या महत्वाच्या बातम्या... - देशातील महत्त्वाच्या बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

Top 10 @  1 PM
Top 10 @ 1 PM
author img

By

Published : Dec 29, 2020, 6:38 AM IST

Updated : Dec 29, 2020, 1:19 PM IST

  • नवी दिल्ली - कोरोना विषाणूने सर्वांना आधीच जेरीस आणले असताना आणखी एक चिंता वाढवणारी बातमी आली आहे. ब्रिटनवरून प्रवास करून भारतात आलेल्या सहा प्रवांशांना नव्या कोरोना विषाणूची लागण झाल्याचे चाचणीत स्पष्ट झाले आहे. बंगळुरू, पुणे आणि हैदराबाद शहरातील प्रयोगशाळेत सहा जणांना नव्या कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

सविस्तर वाचा- चिंताजनक..! नव्या कोरोना विषाणूचे सहा रुग्ण भारतात सापडले

  • चेन्नई - गेले काही वर्षे सुपरस्टार रजनीकांत तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय होणार अशी चर्चा आपण ऐकत आलो आहोत. या पार्श्वभूमीवर त्यांनी रजनीकांत मक्कल मंड्राम या राजकीय पक्षाची घोषणाही केली होती. या पक्षाचे लॉन्चिंग ३१ डिसेंबरला करण्याचा निर्णय त्यांनी रजनी मक्कल मंडरम या संघटनेतील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन घेतला होता. मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आपल्य पक्षाचे लॉन्चिंग रद्द केले आहे. रजनीकांत यांनी आपल्या ट्विटरवरुन त्यांनी ही घोषणा केली आहे.

सविस्तर वाचा- राजकीय पक्ष लॉन्च करणार नाही, रजनीकांत यांची माहिती

  • मुंबई - 'मला धमकी देणारा अजून जन्माला यायचा आहे. जो मला धमकी देईल, तो राहणार नाही,' असा हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत यांनी आज विरोधकांवर केला आहे. पत्नी वर्षा राऊत यांना आलेल्या ईडी नोटिशीच्या पार्श्वभूमीवर संजय राऊत बोलत होते. दरम्यान, ईडीने वर्षा राऊत यांना तिसऱ्यांदा समन्स बजावले असून त्यांना ५ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्या ईडीसमोर चौकशीसाठी हजर होणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

सविस्तर वाचा- संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत ५ जानेवारीला ईडी कार्यालयात हजर होणार

  • मुंबई : सोमवारी काँग्रेसचा १३६वा वर्धापन दिन पार पडला. या दिनाचे औचित्य साधून मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कारभार भाई जगताप यांनी अधिकृतरित्या स्वीकारला. यानंतर पुढील वर्षी होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणूकीमध्ये महापालिकेच्या सर्व जागा काँग्रेस लढवणार असल्याची घोषणा भाई जगताप यांनी केली.

सविस्तर वाचा- मुंबईचा महापौर काँग्रेसचाच होईल; भाई जगतापांनी व्यक्त केला विश्वास

  • हिंगोली - राज्य राखीव दल गट क्रमांक बारा येथे कर्तव्य बजावणाऱ्या एका जवानाने राहत्या घरात पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा- हिंगोलीत जवानाची गळफास घेऊन आत्महत्या; कारण अस्पष्ट

  • मुंबई - काँग्रेस हा मोठा पक्ष आहे. आघाडीचे नेतृत्व मोठा पक्षच करतो, याबाबत आमचेही वेगळे मत नाही, असे म्हणत पुरोगामी लोकशाही आघाडी अर्थात यूपीएच्या अध्यक्षपदावर शिवसेनेने पुन्हा एकदा राग छेडला आहे. त्याचवेळी देशात भाजपविरोधात असंतोष वाढत आहे. लोकांना पर्यायी नेतृत्वाची गरज आहे. राज्याराज्यात प्रादेशिक पक्षांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. या पक्ष नेतृत्वाचे मन वळवण्याचे काम कोण करणार, असा सुचक सवाल शिवसेनेने केला आहे.

सविस्तर वाचा- शिवसेनेचा काँग्रेसला सवाल - प्रादेशिक नेतृत्वाचे मन वळवण्याचे काम कोण करणार?

  • मुंबई - जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाचा प्रसार मुंबईत मार्चपासून सुरू झाला. कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने ७ डिसेंबरपर्यंत १ हजार ३२९ कोटी ४१ लाख रुपये खर्च केले आहेत. येत्या मार्चपर्यंत कोरोनावर खर्च करता यावा, म्हणून पालिकेच्या अर्थसंकल्पातून आणखी ४०० कोटी रुपये आकस्मिक निधीत वळवण्यात आले आहेत. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी सादर करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा- कोरोनाकाळात १,३२९ कोटींचा खर्च, आणखी ४०० कोटींची तरतूद

  • चिक्कामागलुरु: कर्नाटकातील विधान परिषदेच्या उपसभापतींनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. एस.एल. धर्मेगौडा असे त्यांचे नाव आहे. ६४ वर्षीय धर्मेगौडा यांचा मृतदेह रेल्वे रुळावर आढळला. पोलिसांना मृतदेह सापडलेल्या ठिकाणी धर्मगौडा यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेली सुसाईड नोटही सापडली आहे.

सविस्तर वाचा- कर्नाटक विधान परिषदेच्या उपसभापतींची आत्महत्या, रेल्वे रुळावर सापडला मृतदेह

  • मुंबई - चित्रपट निर्माते राज आणि डीके यांच्या आगामी वेब सीरिजमध्ये अभिनेता शाहिद कपूर आणि विजय सेतुपती हे एकत्र येणार असून या मालिकेतून ते डिजीटल पदार्पण करणार आहेत. या बहुप्रतीक्षित वेब मालिकेचे शुटिंग २०२१ च्या जानेवारी महिन्यात सुरू होईल.

सविस्तर वाचा- शाहिद आणि विजय सेतुपती करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण

  • यंदाचे २०२० वर्ष कोरोनाने गाजवले. कोरोनामुळे अनेक गोष्टी थंडावल्या. त्याचा फटका क्रीडाविश्वालाही बसला. या वर्षात क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वांच्या घडामोडींचा आढावा...

सविस्तर वाचा- YEAR ENDER 2020 : क्रीडाविश्वात घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा

Last Updated : Dec 29, 2020, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.