- मुंबई - राम मंदिराच्या नावाने वर्गणी मागून कोणता पक्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार करत आहे, असा प्रश्न विचार शिवसेनेने मुखपत्र सामनामधून अप्रत्यक्षपणे भाजपवर निशाणा साधला आहे. राम मंदिराच्या निर्मितीसाठी प्रत्येक हिंदू कुटुंबाकडून वर्गणी घेतली जाणार आहे. यासाठी जवळपास चार लाख स्वंयसेवक देशभरात फिरुन हा निधी गोळा करणार आहेत. मात्र, या स्वयंसेवकांची नियुक्ती कोणी केला? असा सवाल शिवसेनेने विचारला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर निर्माण करण्यास परवानगी दिली आहे, मग आता तरी त्यावरून राजकारण करणे बंद करायला हवे, असा सल्लाही शिवसेनेने भाजपाला दिला आहे.
सविस्तर वाचा- रामाची वर्गणी...! मंदिराचे राजकारण करणाऱ्या भाजपवर शिवसेनेची टीका
- मुंबई - राम मंदिराच्या निर्मितीसाठी विश्व हिंदू परिषदेचे स्वयंसेवक देशभरात जाऊन वर्गणी गोळा करणार आहेत. मात्र, राम मंदिराच्या नावाने सुरू असलेल्या या प्रकारावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजपावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. तसेच राम मंदिराचा मुद्दा राजकारणातून दूर व्हायला हवा. राजकारणाच्या हेतूने जे प्रकार सुरू आहे, त्या माध्यमातून प्रभू रामाचा आणि त्या मंदिरासाठी रक्त सांडलेल्या कारसेवकांचा अपमान होत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे.
सविस्तर वाचा- 'राम मंदिराचे राजकारण संपवा; वर्गणी गोळा करणे म्हणजे कार सेवकांचा अपमान'
- जळगाव - आकाशगंगेत आज सायंकाळी एक अद्भुत खगोलीय घटना घटणार आहे. सुमारे ४०० वर्षांनंतर या अद्भुत खगोलीय घटनेचा योग येत आहे. आज सायंकाळी सूर्यास्तानंतर पश्चिम दिशेला गेल्या ४०० वर्षांत न दिसलेल्या गुरू आणि शनीच्या महायुतीचा विलक्षण नजारा बघायला मिळणार आहे. या योगामुळे सूर्यमालेतील सगळ्यात मोठा ग्रह गुरू आणि शनी एकमेकांच्या अगदी जवळ आलेले आपल्याला दिसणार आहेत. खगोलीय भाषेत या घटनेला 'ग्रेट जंक्शन' म्हटले जाते, अशी माहिती जळगावातील खगोल अभ्यासक अमोघ जोशी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना दिली आहे.
सविस्तर वाचा- सुमारे ४०० वर्षांनंतर अद्भुत खगोलीय घटनेचा योग; आज सायंकाळी पाहता येणार गुरू-शनीची युती!
- औरंगाबाद - अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांची पहाणी करण्यासाठी केंद्रीय पथकाचा उस्मानाबाद, औरंगाबाद जिल्ह्याच्या दौरा सुरु आहे. या पथकात सहा जणांचा समावेश असून सकाळी ९ वाजल्यापासून या पथकाने आपला पहाणी दौरा सुरु केला आहे.
सविस्तर वाचा-अतिवृष्टी नुकसान पाहणी; केंद्रीय पथक उस्मानाबाद - औरंगाबाद दौऱ्यावर
- पुणे - एका महिला डॉक्टरने रुग्णाला कॅन्सर झाल्याचे सांगत तब्बल दीड कोटीचा गंडा घातला. उपचारासाठी महिला रुग्णाने पगारातून केलेली बचत, प्रॉव्हिडंट फंट, मुदत ठेवी, पोस्टातील ठेवी, घरभाडे तसेच पतीच्या व्यवसायातून बचतीतील सर्व पैसे डॉक्टरला दिले. यानंतरही डॉक्टरने पैशाचा तगादा लावल्यावर रुग्ण महिलेच्या पतीने डॉक्टरच्या उपचाराचा भांडाफोड केला. याप्रकरणी संबधीत महिला डॉक्टरवर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर वाचा- धक्कादायक..! एक फोटो पाहून केले कॅन्सरचे निदान; उपचाराच्या बहाण्याने महिलेला घातला दीड कोटींचा गंडा!
- सिंधुदुर्ग - आम्ही दोन दिवसाचे तरी अधिवेशन घेतले, आपण केंद्रात काय केलात? आम्हाला पळपुटे म्हणता, मग अधिवेशन न घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय म्हणावे? असा प्रश्न विचारत राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारने यंदा केवळ दोनच दिवसांचे अधिवेशनाचे आयोजन केल्याने विरोधी पक्ष भाजपाकडून टीका करण्यात आली होती. त्या अनुषंगाने मंत्री सामंत यांनी भाजपाचा समाचार घेतला. सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
सविस्तर वाचा- आम्ही दोन दिवसांचे तरी अधिवेशन घेतले, केंद्राने काय केले? मंत्री सामंताचा भाजपावर निशाणा
- नागपूर - शहरात आजपर्यंत अनेक विवाह सोहळे पार पडले. मात्र, रविवारी (२० डिसेंबर) सायंकाळी झालेला विवाह सोहळा जरा वेगळा ठरला. एका दिव्यांग जोडप्याचा हा विवाह सोहळा होता. सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापडकर यांच्या पितृतुल्य सवलतीत लहानाचे मोठे झालेल्या समीर आणि वर्षा विवाहबंधनात अडकले. वधूचे पालकत्व राज्याचे गृहामंत्री अनिल देशमुख यांनी तर, वराचे पालकत्व जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्वीकारले होते. टाकळी येथील सद्भावना भवनात थोरा-मोठ्यांच्या आशीर्वादाचा 'वर्षा'व समीरवर झाला.
सविस्तर वाचा- अनाथ दिव्यांग समीर झाला गृहमंत्र्यांचा जावई तर, वर्षा झाली जिल्हाधिकाऱ्यांची सून!
- भुवनेश्वर : आज सकाळी पुरीहून सूरतला जाणाऱ्या सुपरफास्ट एक्स्प्रेसची काही चाकं रुळावरुन खाली घसरली. एका हत्तीला ही रेल्वे धडकल्यामुळे ही दुर्घटना घडली. यामध्ये सर्व प्रवासी सुखरुप असले, तरी हत्तीचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सविस्तर वाचा- हत्तीला धडकून पुरी-सूरत एक्स्प्रेस रुळावरुन घसरली; प्रवासी सुखरुप
- हैदराबाद : तेलंगणाच्या सिद्धीपेट भागामध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी चक्क अभिनेता सोनू सूदचे मंदिर उभारल्याचे समोर आले आहे. सोनू सूदने कोरोना लॉकडाऊनच्या काळात अनेक स्थलांतरित मजूरांची मदत केली होती, यामुळे त्याचे आभार मानण्यासाठी स्थानिकांनी ही पद्धत वापरली आहे.
सविस्तर वाचा- तेलंगणामध्ये उभारले 'सोनू सूद'चे मंदिर!
- अॅडलेड - ''बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉशचा सामना करावा लागू शकतो'', असे स्पष्ट मत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. अॅडलेड येथे खेळल्या गेलेल्या 'पिंक बॉल' कसोटीत ऑस्ट्रेलियाने भारतावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. त्यामुळे पुढच्या सामन्यात टीम इंडिया 'कमबॅक' करण्यास उत्सुक असेल. उभय संघांमधील दुसरा कसोटी सामना २६ डिसेंबरपासून मेलबर्न क्रिकेट मैदानावर (एमसीजी) रंगणार आहे.
सविस्तर वाचा- पाँटिंग म्हणतो, ''कसोटी मालिकेत भारताला व्हाईटवॉश मिळू शकतो''