ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या... - देशातील टॉप बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top-ten-news-stories-around-the-globe
Top 10 @ 11 PM : रात्री अकरा वाजेपर्यंतच्या महत्त्वाच्या बातम्या...
author img

By

Published : Dec 7, 2020, 6:59 AM IST

Updated : Dec 7, 2020, 10:59 PM IST

  • मुंबई - केंद्राच्या कृषी कायद्याच्या विरोधात भाजप विरोधी आघाडीने भारत बंदची घोषणा केली आहे. यावर भाजप नेत्यांनी तीव्र आगपाखड केली असून शेतकरी कायद्या विरोधात राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची भूमिका दुटप्पी असल्याची टीका विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच २०१० साली केंद्रीय कृषी मंत्री असताना शरद पवार यांनीच या कायद्याची शिफारस केली असल्याचा दावा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.

सविस्तर वाचा- कृषी कायद्याविरोधात आघाडीची भूमिका दुटप्पी, पवारांचीच कायद्याला शिफारस - फडणवीस यांचा घणाघात ...

  • रायगड - रिपब्लिक टीव्हीविरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे रद्द करून तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याची अर्णब गोस्वामी यांची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली असून, याचिकेवर सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालाने अर्णब गोस्वामी यांना धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सविस्तर वाचा- अर्णब गोस्वामींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका; सीबीआयकडे तपास देणारी याचिका फेटाळली

  • भंडारा - शरद पवार यांनी 2010 मध्ये कृषीमंत्री असताना लिहिलेले पत्र खरे असून ते पत्र एकदा वाचा, त्याला समजा आणि मग विरोध करा, असा सल्ला प्रफुल पटेल यांनी विरोधकांना दिला आहे. ते आज पवनी येथे कृषीउत्पन्न बाजार समितीतील कार्यक्रमात बोलत होते. पत्रात शरद पवार यांनी केवळ तात्विक गोष्ट नमूद केली असून कायदा कसा असावा, याचा उल्लेख केलेला नाही. असे असताना हे पत्र दाखवून विरोधक केवळ दिशाभूल करत आहेत, असे ते म्हणाले.

सविस्तर वाचा- "शरद पवारांचे पत्र समजून घ्या... मगच चर्चा करा!"

  • मीरा भाईंदर(ठाणे) - उत्तन परिसरात हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. उत्तन परिसरातील धावकी या ठिकाणी बंगल्यात सेक्स रॅकेट सुरू असल्याची माहिती परिमंडळ-१ उपायुक्त अमित काळे यांना मिळाली होती. स्पेशल टीमला पाठवून छापा टाकण्यात आला आहे. यामध्ये दोन महिला दलालासह चार पीडित मुलींना ताब्यात घेण्यात आले आहे.

सविस्तर वाचा- उत्तन पोलीस ठाणे परिसरातील हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश

  • मुंबई- अभिनेत्री जारा खान हिला तिच्या सोशल माध्यमांवर बलात्काराची धमकी देणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या ओशिवारा पोलिसांनी अटक केली आहे . गेल्या काही महिन्यांपासून अभिनेत्री जारा खानला इन्स्टाग्राम सारख्या एका अज्ञात व्यक्तीकडून बलात्कार करण्याची धमकी दिली जात होती. यासंदर्भात अभिनेत्रीने मुंबई पोलिसांच्या ओशिवारा पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती.
    सविस्तर वाचा- अभिनेत्री जारा खानला बलात्काराची धमकी देणाऱ्या 'तरुणी'ला अटक
  • दिल्ली - गेल्या १२ दिवसांपासून केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे दिल्ली चलो आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशभरातून दिवसेंदिवस अधिक पाठिंबा मिळत आहे. सुरुवातीला केवळ पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशचे शेतकरी दिल्ली सीमेवर आंदोलन करत होते. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आता मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिशा आणि गुजरातमधील शेतकरीही दिल्ली सीमेच्या दिशेने रवाना झाले आहेत. शिवाय, आपापल्या राज्यांमध्येही शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत. हे आंदोलन सुरूच ठेवत उद्या मंगळवारी ८ डिसेंबरला भारत बंद ची हाक शेतकऱ्यांनी दिली आहे.

सविस्तर वाचा- उद्या 'भारत बंद'ची शेतकरी संघटनांची हाक; 'या' पक्षांनी दर्शवला पाठिंबा

  • मुंबई - राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशभरातील काँग्रेस पुन्हा संघटित होत आहे. आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल करणार आहे. मात्र त्यांना समजून घेण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कमी पडले, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

सविस्तर वाचा- "शरद पवार राहुल गांधींना समजून घेण्यात कमी पडले''

  • पुणे - शेतकऱ्यांच्या मनात काय आहे हे जाणून न घेता सरकारने शेतकऱ्यांच्या आंदोलनाला जातीय आणि प्रांतीय रंग देण्याचा प्रयत्न केला. देशातील कोणत्याही शेतकरी संघटनेने नव्या कृषी कायद्याची मागणी केली नव्हती. परंतु असे असतानाही शेतकऱ्यांवर हा कायदा थोपवला जात आहे. देशातील शेतकऱ्यांवर हा अन्याय असून लॉकडाऊन काळात अंबानी आणि अदानी यांचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठीच या कायद्याची निर्मिती करण्यात आली आहे, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले.

सविस्तर वाचा- अदानी, अंबानींचे नुकसान भरून काढण्यासाठीच नव्या कृषी कायद्याची निर्मिती - राजू शेट्टी

  • मुंबई - शेतकरी संघटनांनी आपल्या मागण्यांसाठी उद्या (आठ डिसेंबर) भारत बंदची हाक दिली आहे. या भारत बंदला शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस या तीनही पक्षांनी पाठिंबा दिला आहे. हा कोणताही राजकीय बंद नसून, देशातील शेतकऱ्यांना आपली गरज आहे, त्यामुळे आपण त्याला साथ द्यायला हवी. यासाठी जनतेने स्वेच्छेने उद्याच्या भारत बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले आहे.

सविस्तर वाचा- उद्याचा भारत बंद हा राजकीय नव्हे; शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी - संजय राऊत

  • मुंबई - मनी लॉन्ड्रिंग संदर्भात अटक करण्यात आलेल्या टॉप सिक्युरिटीचा मालक अमित चांदोले यांची ईडी कोठडी वाढवून न देण्याचे विशेष न्यायालयाने दिले होते. या निर्णया विरोधात ईडीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणीत मुंबई उच्च न्यायालयाने विशेष न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देत अमित चांदोले याची न्यायालयीन कोठडीही रद्द केली आहे. यामुळे ईडीला लवकरच अमित चांदोलेची कस्टडी मिळणार असून त्याच्या चौकशीचा मार्ग मोकळा झाला आहे.

सविस्तर वाचा- मनी लॉन्ड्रिंग प्रकरण : अमित चांदोलेची न्यायालयीन कोठडी रद्द; ईडीला पुन्हा मिळणार त्याची कस्टडी

Last Updated : Dec 7, 2020, 10:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.