ETV Bharat / bharat

Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या! - आजच्या ठळक बातम्या

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top ten news stories around the globe
Top 10 @ 7 PM : सायंकाळी सातच्या ठळक बातम्या!
author img

By

Published : Sep 27, 2020, 7:18 AM IST

Updated : Sep 27, 2020, 7:13 PM IST

  • मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (रविवार) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. काल (शनिवार) शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यामुळे आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

सविस्तर वाचा : राऊत-फडणवीस भेटीनंतर शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

  • नवी दिल्ली - कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आज स्वाक्षरी केली. त्यामुळे आता या तिन्ही विधेयकांचे कायद्यात रुपांतर झाले आहे. राज्यसभेमध्ये मंजुरी मिळालेल्या कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वाक्षरी करू नये, अशी विनंती विरोधी पक्षांनी केली होती.

सविस्तर वाचा : शेतकऱ्यांचा विरोध असतानाही कृषी विधेयकांवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची स्वाक्षरी

  • भोपाळ - वडिलांनी ल्युडो खेळात अनेकदा पराभव केल्यावरून एका 24 वर्षीय तरुणीने कौटुंबीक न्यायालयात धाव घेतली, असे कौटुंबीक न्यायालय सल्लागार सरिता रजनी यांनी सांगितले. 'हल्ली मुले पराभव पचवू शकत नाहीत आणि म्हणूनच अशी प्रकरणे समोर येतात. त्यांनी पराभवाचा स्वीकार करायला शिकणे आवश्यक आहे. जिंकणे जितके महत्त्वाचे आहे, तितकेच पराभवही महत्त्वाचा आहे,' रजनी म्हणाल्या.

सविस्तर वाचा : भोपाळ : वडिलांसोबत ल्युडो खेळात हरल्यानंतर तरुणीची कौटुंबीक न्यायालयात धाव

  • मुंबई - महाविकास आघाडी सरकारचे काम समाधानकारक नाही. त्यामुळे हे सरकार स्वतःच्या कृतीतूनच ढासळणार आहे. त्यामुळे शिवसेनेसोबत भाजपची सत्ता स्थापनेची कोणतीही चर्चा नाही व करणारही नाही, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या भेटीबद्दत त्यांना विचारले असता ते बोलत होते.

सविस्तर वाचा : '..म्हणून शिवसेनेसोबत सत्तास्थापनेची चर्चा नाही, 'त्या' अटीवर चर्चा करण्यासाठीच राऊत यांची भेट'

  • जळगाव - राजकारणात कुणी मित्र किंवा शत्रू नसतो. राजकारण ही विचारांची लढाई असते. कोणत्याही दोन राजकीय नेत्यांची भेट होणे यात गैर काहीही नाही, असे मत शिवसेनेचे प्रवक्ते व राज्याचे सार्वजनिक पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगावातील एका कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते. काल मुंबईत एका पंचतारांकित हॉटेलमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची भेट झाली होती.

सविस्तर वाचा : राजकारणात कुणी मित्र किंवा शत्रू नसतो - गुलाबराव पाटील

  • जळगाव : जिल्हा कोविड रुग्णालयात शरीरक्रिया शास्त्र विभागाचे सहयोगी प्रा. डॉ. चंद्रशेखर डांगे यांनी सलग चौथ्यांदा ‘डीन’च्या खुर्चीचा ताबा घेतला. आता मीच ‘डीन’ असा आविर्भाव दाखवत ते ‘डीन’च्या खुर्चीवर बसले आणि टेबलावर पाय टाकून बसून ‘मी सर्वांचा बॉस आहे’, असे सांगत आज सकाळी गोंधळ घातला. विशेष म्हणजे, महाविद्यालयाचे डीन डॉ. जयप्रकाश रामानंद हे त्यांच्या कार्यालयात होते. त्यांच्यासमोर हा प्रकार घडल्याने तेही चक्रावून गेले.

सविस्तर वाचा : ‘डीन’च्या खुर्चीवर अनधिकृतरित्या ताबा, सहयोगी प्राध्यापकाविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

  • अमरावती - आज अधिक मासातील कमला एकादशी आहे. त्यामुळे परंपरेनुसार पूजेच साहित्य पाण्यात टाकण्यासाठी आई सोबत नदीवर गेलेल्या ३ मुलांचा आणि एका आईचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील निभोरा राज येथे घडली. यश चवरे (१३), जीवन चवरे(१४), सोहम झेले (१२) पुष्पा चवरे अशी मृत माय लेकांची नावे आहेत. तर यावेळी बुडणाऱ्या या चौघांना वाचविण्याच्या प्रयत्नान इतर तीन महिला देखील जखमी झाल्या आहेत.

सविस्तर वाचा : अंघोळीसाठी गेलेले तीन चिमुकले नदीत बुडाले; वाचवण्याच्या प्रयत्नातील आईचाही मृत्यू

  • मुंबई - मी देवेंद्र फडणवीस यांना भेटणं काय अपराध आहे का ? देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आहेत. भाजपचे जेष्ठ नेते आहेत. राज्यातील दोन वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांनी भेटणं म्हणजे अपराध नाही. देवेंद्र फडणवीस आणि आमच्यात वैचारिक मतभेद असले तरी आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. ते रविवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत शनिवारी झालेल्या भेटीबद्दल खुलासा केला.

सविस्तर वाचा : 'आम्ही बंकर मध्ये भेटलो नाही.. फडणवीसांची भेट घेणे अपराध आहे का?'

  • नवी दिल्ली - केंद्र सरकारने नुकतेच तीन कृषी विधेयके मंजूर केली आहेत. त्यास शिरोमणी अकाली दल या भाजपच्या सहकारी पक्षाने विरोध केला होता. पक्षाच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी मदभेदानंतर राजीनामा दिला आहे. मात्र, आता पक्षाने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतूनच (एनडीए) बाहेर पडल्याचे जाहीर केले आहे.

सविस्तर वाचा : कृषी विधेयकावरील मतभेदानंतर शिरोमणी अकाली दल एनडीएतून बाहेर

  • दुबई - आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबकडून झालेल्या पराभवानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीवर जोरदार टीका झाली. विराटने या सामन्यात क्षेत्ररक्षणात आणि फलंदाजीत सुमार कामगिरी केली. चाहत्यांनीही विराटच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. या सामन्यानंतर विराटचे बालपणीचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

सविस्तर वाचा :''विराट मशीन नसून एक माणूस असल्याचे लोक विसरले आहेत''

Last Updated : Sep 27, 2020, 7:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.