नागपूर - कोरोनावर प्रतिबंधात्मक लसीच्या मानवी चाचणीला येत्या एक-दोन दिवसात सुरुवात होणार आहे. देशभरात 12 ठिकाणी होणार असून यात महाराष्ट्रातील नागपूरचाही समावेश आहे. नागपूरच्या गिल्लुरकर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये ही चाचणी पार पडणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास येत्या १५ ऑगस्टला ही लस लॉन्च करण्याचा सरकारचा प्रयत्न असणार आहे.
वाचा सविस्तर - एक्सक्लुझिव्ह : नागपुरातही अँटी कोविड लसीची होणार मानवी चाचणी, 'अशी' असेल प्रक्रिया
मुंबई - महाविकास आघाडीतील नेत्यांमध्ये निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर आज (शुक्रवार) राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दादर येथील बाळासाहेब ठाकरे स्मारकात भेट घेतली.
वाचा सविस्तर - महाविकास आघाडीतील मतभेदावर शरद पवारांनी उद्वव ठाकरेंना दिला 'हा' मोलाचा सल्ला
नवी दिल्ली - पूर्व लडाखमधील भारत- चीन सीमावादावर जपानने भारताला पाठिंबा दिला आहे. सीमेवर एकतर्फी बदल करण्याच्या चीनच्या कृतीचा जपानच्या भारतातील राजदुताने विरोध दर्शवला आहे. 15 जूनला गलवान खोऱ्यात चीनी आणि भारतीय लष्करात धुमश्चक्री झाली. यामध्ये 20 भारतीय जवान शहीद झाले. तेव्हापासून सीमेवर तणाव निर्माण झाला असून परिस्थिती निवळलेली नाही.
वाचा सविस्तर - लडाखमधील चीनबरोबरच्या सीमावादत जपानचा भारताला पाठिंबा
नवी दिल्ली : भारत- चीन सीमावादाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज(शुक्रवार) अचानक लडाखला भेट देत सीमेवरील लष्कराच्या तयारीचा आढावा घेतला. मोदींनी दिलेल्या भेटीवरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांचे आभार मानले आहेत. मोदींच्या भेटीमुळे सैनिकांचे मनोबल वाढल्याचे राजनाथ सिंह म्हणाले.
वाचा सविस्तर - 'लडाखमधील सैनिकांचे मनोबल वाढविल्याबद्दल पंतप्रधान मोदींचे धन्यवाद'
मुंबई - भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची आज (शुक्रवार) घोषणा करण्यात आली. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली.
वाचा सविस्तर - भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर; पंकजा मुंडेंना केंद्रात जबाबदारी
संगमनेर (अहमदनगर) - किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी आपल्या किर्तनातून प्रसूतीपूर्व गर्भलिंग चिकित्सा नियंत्रण कायद्याचा भंग केल्याने त्यांच्याविरोधात संगमनेर न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी आज संगमनेर सत्र न्यायालयात याबाबतची पहिली सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने इंदोरीकर महाराजांना समन्स बजावला आहे. येत्या सात ऑगस्टला त्यांना न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.
वाचा सविस्तर - इंदोरीकर महाराजांना समन्स, ७ ऑगस्टला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
लेह- विश्वयुद्धाच्या वेळी जगाने भारतीय सैनाची ताकद पाहिली आहे. विस्तारवादाने मानुसकीचे मोठे नुकसान होते. विस्तारवादाचे युग आता समाप्त झाले आहे. आता केवळ विकासवादच वर्तमान आणि भविष्य आहे, असा टोला पंतप्रधान मोदी यांनी चीनला लगावला आहे. लेहेमध्ये जवानांना संबोधित करताना ते बोलत होते.
वाचा सविस्तर - 'विस्तारवादाचे युग संपले, आता विकासवादच वर्तमान आणि भविष्य'
लखनऊ - कानपूरमध्ये एका गुंडाला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गोळीबार झाला. या चकमकीत आठ पोलीस कर्मचाऱ्यांना वीरमरण आले. या घटनेनंतर उत्तर प्रदेश राज्यातील राजकीय वातावर पेटले असून विरोधी पक्षांनी योगी सरकारवर हल्लाबोल केला. राज्यामध्ये कोणीच सुरक्षित नसल्याचे विरोधी पक्षांनी म्हटले आहे. काँग्रेस नेत्यांसह समाजवादी पक्षाने सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे.
वाचा सविस्तर - कानपूर चकमक: राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून विरोधी पक्षांचा योगी सरकारवर हल्लाबोल
मुंबई - हवामान खात्याने गुरुवारी मुंबईसह आसपासच्या भागात जोरदार पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार आज सकाळपासून पावसाला सुरुवात झाली असून सकाळी 8 ते 9 च्या दरम्यान, कुलाबा परिसरात 24 मि.मी. तर नरिमन पॉईंट परिसरात 19 मिमी नोंद करण्यात आली आहे. मुंबईसह पूर्व उपनगरामध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.
वाचा सविस्तर - हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला; मुंबईसह उपनगरामध्ये जोरदार पाऊस
सिंधुदुर्ग - जिल्ह्यात गुरुवारी सर्वत्रदूर मुसळधार पाऊस झाला. रात्रभर सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी नद्यांना पूर आला असून शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. कुडाळ तालुक्यातील आंबेरी पुलावर पाणी आल्याने आसपासच्या 27 गावांचा संपर्क तुटला आहे.
वाचा सविस्तर - सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्यांना पूर