- मुंबई - डोंगरी येथील सरदार वल्लभभाई पटेल रोडवर भारत पेट्रोल पंप समोर असलेल्या एसटी इमारतीचा भाग आज सकाळी कोसळला. एक महिला ढिगाऱ्याखाली अडकली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबतची माहिती मुंबई पोलीस कंट्रोल रुमने पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाला दिली आहे.
सविस्तर वाचा- डोंगरीत इमारतीचा भाग कोसळला, एक महिला अडकल्याची भीती
- पुणे - शहरातील वडगाव शेरी परिसरातील गणेश नगर येथे घरगुती सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये घराची मोठ्या प्रमाणात पडझड झाली असून एकूण १० जण जखमी झाले आहे. त्यांना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
सविस्तर वाचा- पुण्यातील वडगाव शेरी परिसरात घरगुती सिलेंडरचा स्फोट, 10 जण जखमी
- पालघर - नालासोपारा पूर्वेकडील संकेश्वर नगर परिसरातील साफल्य नावाची चार मजली इमारत कोसळल्याची घटना समोर आली आहे. ही इमारत 10 वर्षे जुनी असून मंगळवारी मध्यरात्री इमारतीचा काही भाग कोसळला होता. इमारत कोसळत असल्याच्या आवाजाने इमारतीतील रहिवासी जागे झाले; आणि खबरदारी म्हणून संपूर्ण इमारत खाली करण्यात आली. मात्र सर्व रहिवासी इमारतीतून बाहेर येताच अवघ्या काही क्षणातच संपूर्ण इमारत कोसळली.
सविस्तर वाचा- आणखी एक दुर्घटना...नालासोपाऱ्यात चार मजली इमारत कोसळली!
- एकोणिसाव्या शतकात जगाने दोन महायुद्धे पाहिली. सत्ता स्पर्धा आणि जागतिक राजकारणात वर्चस्व सिद्ध करण्यासाठी अनेक देशांनी या महायुद्धामध्ये सहभाग घेतला. १९३९ ते १९४५ या सहा वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत दुसरे महायुद्ध झाले. या विनाशकारी महायुद्धाला २ सप्टेंबर २०२०ला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. दुसरे जागतिक महायुद्ध होण्यामागे कोणती कारणे होती याची बाबत घेतलेला हा आढावा...
सविस्तर वाचा- ...म्हणून झाले विनाशकारी दुसरे महायुद्ध
- मुंबई - सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मुंबई पोलिसांकडून सुरुवातीच्या टप्प्यात तपास सुरू असताना अचानक सीबीआयकडे देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. या संदर्भात मागील 12 दिवसांपासून सीबीआय तपास सुरू आहे. आतापर्यंत रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती, कुक केशव, नीरज, सिद्धार्थ पिठाणी व इतर व्यक्तींची चौकशी केल्यानंतर मंगळवारी रिया चक्रवर्तीचे वडील इंद्रजित चक्रवर्ती व तिच्या आईची सुद्धा सीबीआयने चौकशी केली आहे. मात्र सुशांतची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. याच प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या वडिलांची पुन्हा चौकशी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सविस्तर वाचा- सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : रिया चक्रवर्तीच्या वडिलांची पुन्हा चौकशी होणार?
- नवी दिल्ली : गेल्या २४ तासांमध्ये देशात तब्बल ७८ हजार ३५७ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. आतापर्यंतची एका दिवसात नोंदवली गेलेली ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. यानंतर देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्याही ३७ लाखांवर गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी याबाबत माहिती दिली.
सविस्तर वाचा- देशातील कोरोनाग्रस्तांचा नवा उच्चांक; एकाच दिवसात आढळले ७८ हजार ३५७ रुग्ण
- मुंबई - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खासगी आणि धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत असलेल्या रुग्णालयांमधील शासनाने दर नियंत्रित केलेल्या ८० टक्के खाटा कोरोनासह अन्य रुग्णांच्या उपचारासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. या निर्णयास आता आणखी तीन महिने मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भात सोमवारी आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने सुधारीत अधिसूचना काढण्यात आली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
सविस्तर वाचा- CORONA : खासगी रुग्णालयातील दर नियंत्रित खाटा राखीव ठेवण्याच्या निर्णयाला तीन महिन्यांची मुदतवाढ
- लातूर - राष्ट्रसंत तथा लिंगायत समाजाचे धर्मगुरु डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कार हे भक्तीस्थळावर व्हावेत, अशी इच्छा डॉ. शिवलिंग शिवाचार्य यांनी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्याकडे तसेच कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. त्यानुसार मंगळवारी रात्री अकराच्या दरम्यान दफनविधी करण्यात आला आहे. अहमदपूरकर मठाचे उत्तराधिकारी राजशेखर स्वामी आणि हडोळती मठाचे उत्तराधिकारी यांनी विधीवत पूजा करून डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
सविस्तर वाचा- डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची अंतिम इच्छा पूर्ण ; भक्तीस्थळावर अंत्यसंस्कार
- नवी दिल्ली - काँग्रेसमधील वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद आणि कपिल सिब्बल यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजपमध्ये यावे, असे मत केंद्रीय राज्यमंत्री (सामाजिक न्याय) रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.
सविस्तर वाचा- काँग्रेसला रामराम ठोकून भाजपात या; आठवलेंचा सिब्बल आणि गुलाम नबी आझादांना सल्ला
- हैदराबाद - दुसरे महायुद्ध १९३९ ते १९४५ च्या दरम्यान मुख्यता युरोप आणि आशियाई धरतीवर झालेले नरसंहारक युद्ध होते. या युद्धात सुमारे ६ कोटींपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला. तर लाखो जखमी झाले. आज(२ सप्टेंबर) या युद्धाला ७५ वर्ष पूर्ण होत आहेत. पहिल्या महायुद्धातील व्हर्सायाच्या मानहानीकारण तहाचा बदला घेण्यासाठी जर्मनी पेटून उठला होता. जर्मनीने पोलंडवर १ सप्टेंबर १९३९ ला चढाई केली. अन् अधिकृतरित्या युद्धाला सुरुवात झाली. दुसऱ्या महायुद्धात जर्मन सैन्याने 'ब्लिट्झक्रिग' या युद्धनितीचा वापर केला. हा युद्ध पद्धतीनं मित्र पक्षाला सळो की पळो करुन सोडलं. काय होती ही युद्धनिती?
सविस्तर वाचा- दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या 'ब्लिट्झक्रिग' युद्धनीतीनं मित्र राष्ट्रांना फोडला होता घाम
- कोलकाता - बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आणि गायिका नेहा कक्कर यांच्या पाठोपाठ आता पश्चिम बंगालमधील एका महाविद्यालयाच्या गुणवत्ता यादीत चक्क शिनचॅनचेही नाव आले आहे.
सविस्तर वाचा- 'शिनचॅन' झाला बीएस्सी पास! बंगालमधील कॉलेजच्या गुणवत्ता यादीत नाव