ETV Bharat / bharat

Top 10 @ 11 PM : रात्री 11 पर्यंतच्या ठळक बातम्या...

राज्यासह देश, विदेशातील राजकारण, कोरोना यासह इतर महत्त्वाच्या बातम्या. वाचा, एका क्लिकवर...

top10
top10
author img

By

Published : Sep 25, 2020, 8:34 PM IST

Updated : Sep 26, 2020, 1:47 AM IST

मुंबई - राज्यात आज १७ हजार ७९४ नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १३ लाख ७५७ झाली आहे. राज्यात २ लाख ७२ हजार ५७२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आज राज्यात ४१६ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून, मृतांची संख्या ३४ हजार ७६१ वर पोहोचली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६७ टक्के एवढा आहे. राज्यात आज १९ हजार ५९२ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.

सविस्तर वाचा - राज्यात दिवसभरात 17 हजार 794 नवे कोरोना रुग्ण; 19 हजार 592 कोरोनामुक्त

पुणे - केंद्राने जाहीर केलेली नवी कृषी विधेयके राज्यात लागू करणार नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. कृषी कायद्याला देशभरात विरोध होत आहे. त्यामुळे कृषी कायदा लागू न करण्याची भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. नवे कामगार विधेयक देखील लागू करायचे की नाही याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करू, असे पवार म्हणाले. पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी त्यांनी पुण्यात बैठक घेतली. या बैठकीनंतर ते बोलत होते.

सविस्तर वाचा - राज्यात नवीन कृषी विधेयके लागू करणार नाही - अजित पवार

पुणे - उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी सकाळी आपल्या ट्विटरवरून एक मेसेज ट्विट केला होता. त्यानंतर काही वेळाने ते ट्विट डिलीट करण्यात आले होते. वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून ते ट्विट डिलीट केले, असे उत्तर अजित पवार यांनी आज पुण्यात दिले. जनसंघाचे नेते पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करणारे ते ट्विट होते.

सविस्तर वाचा - वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं म्हणून 'ते' ट्विट डिलीट केलं - अजित पवार

रत्नागिरी - खासदार विनायक राऊत यांनी टीकेच्या व्यतिरिक्त पुराव्यांबाबत कोणताच खुलासा केला नसून कागदही वाचू न शकणाऱ्या विनायक राऊतांनी आधी खुलासा करावा, असे आव्हान भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी दिले आहे. भाजपचे नेते माजी खासदार निलेश राणे यांनी नाणार रिफायनरी संदर्भात पत्रकार परिषद घेतली होती. त्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांची नावं घेऊन त्यांचे घोटाळे, भ्रष्टाचार, सर्वे नंबर, गट नंबर, हिस्सा नंबर पुराव्यासकट पत्रकार परिषदेत सादर केले होते. यावर खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया देत निलेश राणे यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्या टीकेला प्रत्युत्तर देत निलेश राणे यांनी खासदार राऊत यांना आव्हान दिले आहे.

सविस्तर वाचा - खासदार विनायक राऊत दहावी नापास, कागदपत्रेही वाचू शकत नाही; नाणारवरुन निलेश राणेंची खरमरीत टीका

नवी दिल्ली - हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने भारताविरोधात न्यायालयीन दावा लढणाऱ्या व्होडाफोनच्या बाजूने निकाल दिला आहे. त्यामुळे 20 हजार कोटींची व्होडाफोनकडून होणारी करवसुली थांबण्याची शक्यता आहे. भारतीय कर विभागाने योग्य आणि समान वागणुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने निकालात म्हटले आहे.

सविस्तर वाचा - धक्का! २० हजार कोटींच्या करवसुली प्रकरणात भारताविरोधात व्होडाफोनच्या बाजूने हेग कोर्टाचा निकाल

नवी मुंबई - काँग्रेस पक्षाने २०१९च्या जाहीरनाम्यात शेतीसंदर्भात जे काही म्हटले होते, त्याचा या नव्या कृषी विधेयकात समावेश आहे. मात्र, आता ते या विधेयकाला विरोध करत आहेत. आम्ही सत्तेत आलो तर हे करणार. मात्र, नाही आलो तर, दुसऱ्यांना करू देणार नाही, अशी यांची ही आडमुठी भूमिका झाली. कृषी विधेयकावर केवळ राजकारण केले जात आहे. या विधेयकाची अंमलबजावणी न करणे हे शेतकरी विरोधी आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

सविस्तर वाचा - 'कृषी विधेयकातील अनेक मुद्दे काँग्रेसच्याही जाहीरनाम्यातील, मग विरोध का?'

नवी दिल्ली - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे (आयओसी) अध्यक्ष थॉमस बाख यांना सिओल शांती पुरस्कार देण्यात येणार आहे. २०१८च्या पेयोंगचांग हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान शांततेला प्रोत्साहन देण्यासाठी बाख यांना हा पुरस्कार मिळणार आहे. ''बाख यांनी ऑलिम्पिकच्या लोकप्रियतेत वाढ करण्याचे कार्य केले. त्यांनी खेळाच्या माध्यमातून शांती प्रस्थापित करण्यासाठी समर्पितपणे कार्य केले आहे'', असे सिओल शांती पुरस्कार फाउंडेशनने सांगितले.

सविस्तर वाचा - आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख यांचा होणार गौरव

नवी दिल्ली - कृषी विधेयकाला विरोध करत शेतकरी संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला आहे. कृषी विधेयक शेतकरी विरोधी असल्याचे म्हणत अनेक शेतकरी संघटनांनी आंदोलन सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत, त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे.

सविस्तर वाचा - कृषी विधेयक वाद : 'शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत काँग्रेस करणार आंदोलन'

सांगली - कोरोना लॉकडाऊनमुळे अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. नोकरी गेल्याने अनेकांना रोजंदारीवर मोलमजुरी करण्यासाठी जावे लागत आहे. अगदी पुरस्कारप्राप्त साहित्यिकसुद्धा यातून सुटू शकले नाही. साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेले युवा लेखक नवनाथ गोरे यांच्यावरही मजूरी करण्याची वेळ आली आहे. 300 ते 400 रुपयांच्या रोजंदारीवर शेतामध्ये मजुरी करण्याची वेळ गोरे यांच्यावर आली आहे.

सविस्तर वाचा - कोरोनाचा कहर: साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त 'फेसाटी'कारावर मोलमजुरीची वेळ!

मुंबई - गेल्या सहा महिन्यांपासून उपासमारीला सामोरे जावे लागलेल्या मुंबई डबेवाहतूक मंडळाने शुक्रवारी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी मुंबईतील लोकल सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्याची आणि डबेवाल्यांना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळवून देण्याच्या मागणीसोबतच डबेवाल्यांच्या बोगस संस्थांना आवर घालण्यासाठी सहकार्य करावे, अशा विविध मागण्या राज ठाकरे यांच्याकडे केल्या.

सविस्तर वाचा - मुंबईचा डबेवाला पुन्हा राज ठाकरेंच्या भेटीला.. मागण्या सरकारपर्यंत पोहोचविण्याचे आश्वासन

Last Updated : Sep 26, 2020, 1:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.