मुंबई - सोलापूरच्या पानगाव येथील सुनील ऊर्फ किशोर काळे यांना पुलवामातील बंदजू परिसरात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले आहे... पुलवामामधील बंदजू परिसरात झालेल्या सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यातील चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले.... सलग सतराव्या दिवशी इंधनाची दरवाढ सुरूच असून आज पेट्रोलचे 20 पैशांनी तर डिझेलचे 55 पैशांनी वाढले, यासह महत्वाच्या टॉप-१० बातम्या...
- नवी दिल्ली – सलग सतराव्या दिवशी इंधनाची दरवाढ सुरूच आहे. पेट्रोलचे दर प्रति लिटर 20 पैशांनी वाढले आहेत, तर डिझेलचे दर प्रति लिटर हे 55 पैशांनी वाढले आहेत. या सतरा दिवसांत पेट्रोल प्रति लिटर हे 8.5 रुपयांनी, तर डिझेल हे 10.01 रुपयांनी प्रति लिटर महागले आहे.
सविस्तर वाचा - पेट्रोल डिझेलच्या महागाईचा भडका थांबेना; जाणून घ्या आजचे दर
- सोलापूर - बार्शी तालुक्यातील पानगाव येथील सुनील ऊर्फ किशोर काळे यांना पुलवामातील बंदजू परिसरात अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत वीरमरण आले आहे. सुनील काळे हे त्यांचे कागदोपत्री नाव असले तरी त्यांना सर्वजण किशोर या नावानेच ओळखतात.
सविस्तर वाचा - पुलवामात दहशतवाद्यांशी लढताना सोलापुरातील जवान सुनील काळे यांना वीरमरण
- मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यातही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. त्यातच दादर येथील शिवसेना भवनात एका ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शिवसेना भवन काही दिवसांसाठी सील करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - शिवसेना भवन सील, ज्येष्ठ शिवसैनिकाला कोरोना
- पुलवामा - जम्मू-काश्मीरच्या पुलवामामधील बंदजू परिसरात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात जोरदार चकमक झाली. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय सैन्याला यश आले. एक जवानाला या चकमकीत वीरमरण आले आहे. दरम्यान, या परिसरात शोधमोहिम सुरू आहे.
सविस्तर वाचा - J-K : पुलवामा चकमक; दोन दहशतवाद्यांचा खात्मा, एक जवानाला वीरमरण
- 15 व 16 जून 2020 च्या दैवगर्भ रात्री सोसाट्याच्या वारा सुरू असताना बर्फाच्छादित गलवान खोऱ्यात भारत आणि चीन यांच्यात 1988 साली परस्पर सौहार्द निर्माण करण्यासाठी अंमलात आणण्यात आलेल्या उपाययोजना (कॉन्फिडन्स बिल्डींग मेजर्स - सीबीएम) व्यवस्थेस अखेर निर्णायक झटका बसला. गेल्या दशकभरात हा दिवस कधीही उगवण्याची शक्यता होती.
सविस्तर वाचा - शिष्टाचार आणि परस्पर सौहार्द उपाययोजनांसाठी काळरात्र
- भुवनेश्वर (ओडीशा) - सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर पुरी येथील जगन्नाथ रथ यात्रेला सुरुवात झाली आहे. यासाठी येथील प्रशासनाने सर्व उपाययोजना केल्या आहे. मात्र, दरवर्षी भक्तांचा जसा मोठा जनसागर या ठिकाणी असतो, तसा जन समुदाय यंदा नाही. भक्तांना पुरीला येण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यांनी घरीच राहून दर्शन करण्याचे आवाहन त्यांना करण्यात आले आहे.
सविस्तर वाचा - ओडीशा: पुरी येथील जगन्नाथ रथयात्रेला सुरुवात, भक्तांना घरीतूनच घ्यावे लागणार दर्शन
- यवतमाळ - कोरोनाचे संकट डोक्यावर असताना, पेरलेले सोयाबीन बियाणे न उगवल्यामुळे शेतकऱ्यांना नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे. यवतमाळ जिल्ह्यातील हजारो हेक्टरवरील पेरलेले सोयाबीन बियाणे चक्क वांझ निघाल्याचे समोर आले आहे. या संदर्भात रघुनाथ गोरे, नामदेव राठोड, देऊ राठोड, नामदेव जाधव यांनी पुसद तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली असून त्यांनी संबंधित कंपन्यांवर तातडीने फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. कृषी विभागाकडून याचे पंचनामे करण्यात येत आहेत.
सविस्तर वाचा - हजारो हेक्टरवर पेरलेले सोयाबीन बियाणे उगवलेच नाही; पंचनामे सुरू
- ठाणे - कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या दोन स्थायी समिती सदस्यांनाच कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिकेत खळबळ उडाली आहे. कोरोना पॉझिटिव्ह असलेले हे सदस्य स्थायी समितीच्या बैठकीला उपस्थित होते. यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्या अन्य दोन स्थायी समिती सदस्यांना ही 14 दिवस विलगीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सविस्तर वाचा - कल्याण-डोंबिवली महापालिकेत कोरोना, स्थायी समितीत दोघांना लागण
- मुंबई - लॉकडाऊनमध्ये राज्यातील सर्व दुकानातील व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांकडे फक्त ऑनलाइन शॉपिंग हा एकमेक पर्याय उरला होता. त्यामुळे नागरिकांनी घरातील किराणा सामानापासून तर सर्व आवश्यक असणाऱ्या इतर गोष्टींची ऑनलाइन खरेदी करण्यास सुरुवात केली. सध्या सर्व व्यवहार क्रेडीट-डेबिट कार्ड आणि नेटबँकिंगद्वारे मोठ्या प्रमाणात होत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सायबर विभागाकडे फसवणुकीच्या तक्रारी प्राप्त होत असल्याचे समोर आहे.
सविस्तर वाचा - ऑनलाइन शॉपिंग करताना सावध राहा, 'विशेष प्रोग्रॅम कोड'ने केली जातेय लूट
- नांदेड - संकटात सापडलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यातील पांगरी (ता.अर्धापूर) येथील शेतकऱ्यांच्या केळी बांधावरून थेट इराणला निर्यात करण्यासाठी पहिली गाडी रवाना झाली. हा माल मुंबईतील बंदरावरून जहाजाद्वारे पाठविण्यात येणार आहे. केळी सातासमुद्रापार जाण्याच्या वाटा खुल्या झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षाही उंचावल्या आहेत.
सविस्तर वाचा - नांदेडची केळी सातासमुद्रापार, जिल्ह्यातून पहिल्यांदा इराणला होतेय निर्यात