ETV Bharat / bharat

Top १० @ ११ PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या...

author img

By

Published : Jun 28, 2020, 1:07 PM IST

Updated : Jun 28, 2020, 10:56 PM IST

रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या...

top 10 new at 11 pm
Top १० @ ११ PM : रात्री अकरापर्यंतच्या ठळक बातम्या...
  • मुंबई : राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत आहे. मुख्यमंत्र्यांनी 30 जून रोजी संपणारा लॉकडाऊन कायम राहील असे स्पष्ट केले आहे. यादरम्यान, राज्यात आज कोरोनाच्या ५हजार ४९३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ७० हजार ६०७ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज २हजार ३३० रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ८६ हजार ५७५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.५९ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

सविस्तर वाचा : COVID-19 : सलग तिसऱ्या दिवशी पाच हजार नव्या रुग्णांची नोंद..

  • कोल्हापूर - 'कुणी कुणाला धमकी द्यायची आवश्यकता नाही. आम्ही कुणाला घाबरत नाही. सुरुवात कोणी केली महत्त्वाचे नाही. याचा शेवट काहीही होऊ शकतो,' असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे.

सविस्तर वाचा : 'चंपा आणि टरबुजा म्हणणं कसं चालतं?.., चंद्रकांत पाटलांचा मुश्रीफांवर पलटवार

  • वर्धा - सावंगी पोलीस ठाण्यांतर्गत सेलसुरा शिवारात नोकरीसाठी मुलाखत घ्यायची आहे, असे सांगून एका विवाहितेवर काल रात्री अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 6 जणांना सावंगी पोलिसांनी अटक केली असून त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

सविसत्तर वाचा : संतापजनक.. पतीसमोरच विवाहितेवर सामूहिक बलात्कार, वर्ध्यातील घटना

  • जळगाव- हिंदी चित्रपट अभिनेता सुशांतसिंह राजपूत याने काही दिवसांपूर्वी मुंबईत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या घटनेची अद्यापही सर्वत्र जोरदार चर्चा आहे. आज जळगाव तालुक्यातील शिरसोली गावातही अशीच काहीशी घटना घडली आहे. शिरसोली येथील एका तरुणाने सुशांतसिंहच्या चित्रपटातील गाणे व्हॉट्सअ‌ॅप स्टेटसवर ठेऊन राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी 3.30 वाजता घडली असून यामुळे शिरसोली गावात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा : सुशांतसिंह राजपूतचे गाणे व्हॉट्सअ‌ॅप स्टेटसवर ठेऊन जळगावातील तरुणाची आत्महत्या

  • मुंबई- कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने घातलेला शेअर बाजार अनलॉक नंतर सातत्याने वर जात असताना सुरुवातीच्या टप्प्यात राज्य सरकारांच्या कर्जरोख्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या गुंतवणूकदारांनी सुरक्षेचा विचार करून महाराष्ट्र सरकारच्या कर्जरोख्यांना अपेक्षेपेक्षा जास्त प्रतिसाद दिला आहे..

सविस्तर वाचा : आर्थिक अडचणीतील महाराष्ट्राला कर्जरोख्यांतून दीड हजार कोटींचा लाभ

  • मुंबई- 1 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांना कावासाकी आजार होतो. तर हा आजार नवीन नसून 50 वर्षे जुना आजार आहे. भारतात वर्षाला या आजाराचे दोन-तीन रुग्ण आढळतात. कावासाकी विषाणू मुलांच्या थेट हृदयात प्रवेश करत स्नायूंवर हल्ला करतो. त्यामुळे मुलांची प्रकृती गंभीर होते.

सविस्तर वाचा : पालकांनो सावधान! 'ही' लक्षणे मुलांमध्ये असल्यास त्वरित रुग्णालय गाठा

  • मुंबई : जवळपास महिनाभराच्या खंडानंतर राज्यातील जनतेला सामोरे जाताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक चक्र सुरू करण्यासाठी महाराष्ट्रात मिशन बिगीन अगेन सुरू केलं असल्याचे सांगितले. कोरोनाचं संकट अद्याप कायम असून, धोका टळलेला नाही. त्यामुळे, गर्दी करू नका, आवश्यक कामासाठीच बाहेर जा असे आवाहन त्यांनी आज केले..

सविस्तर वाचा : पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा का, याचा निर्णय जनतेलाच घ्यायचा आहे - मुख्यमंत्री

  • चेन्नई - तामिळनाडूतील तुतीकोरीनमधील पिता पुत्राच्या कोठडीतील छळाचे प्रकरण राज्य सरकारने सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणानंतर राज्यभरात पोलिसांच्या अमानुष छळाविरुद्ध संताप व्यक्त केला जात आहे. हे प्रकरणी सीबीआयकडे देण्यात येईल असे, मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी आज(रविवारी) स्पष्ट केले.

सविस्तर वाचा : तुतीकोरीन पोलीस कोठडीतील छळ प्रकरण सीबीआयकडे हस्तांतरीत करणार - तामिळनाडू सरकार

  • काठमांडू - भारत नेपाळमध्ये सीमावाद सुरु झाला असताना नेपाळचे पंतप्रधान के. पी ओली यांनी भारत सरकारवर गंभीर आरोप केला आहे. नेपाळमधील सरकार अस्थिर करण्यासाठी दिल्लीत बैठका झाल्याचे वक्तव्य पंतप्रधान ओली यांनी केले आहे. नेपाळने नुकतेच भारताच्या हद्दीतील महत्त्वाचे भूभाग स्वत:च्या नकाशात समाविष्ट केले असून यासंबधीचा कायदाही पास केला आहे.

सविस्तर वाचा : आमचे सरकार उलथून टाकण्यासाठी दिल्लीत बैठका, नेपाळच्या पंतप्रधानांचा आरोप

  • बीजिंग - पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या मारहाणीनंतर चीनने सीमेवर 'मार्शल आर्ट फायटर' तैनात केले असल्याची माहिती अहवालांतून समोर येत आहे. 15 जूनला सीमेवर झालेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.

सविस्तर वाचा : गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर चीननं सीमेवर तैनात केले 'मार्शल आर्ट फायटर'

Last Updated : Jun 28, 2020, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.