ETV Bharat / bharat

असं काय घडलं....लग्नाच्या पहिल्याच रात्री बायकोचा केला खून, नंतर स्वत:ही घेतली फाशी - Murder in Tamil Nadu

विवाह झाल्यानंतर पहिल्याच रात्री पतीने आपल्या पत्नीचा खून केला अन नंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना काल (बुधवारी) चेन्नईजवळील मिंजूर येथे घडली.

नवविवाहीत जोडपे हत्या तामिळनाडू
नवविवाहीत जोडपे हत्या तामिळनाडू
author img

By

Published : Jun 11, 2020, 10:23 PM IST

चेन्नई - तामिळनाडू राज्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवविवाहीत जोडप्याची मधुचंद्राची पहिली रात्रच शेवटची ठरली. विवाह झाल्यानंतर पहिल्याच रात्री पतीने आपल्या पत्नीचा खून केला अन् नंतर स्वत:ही गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना काल (बुधवारी) चेन्नईजवळील मिंजूर येथे घडली.

मृत पतीचे नाव नितीवसन (24) असून पत्नीचे नाव संध्या(20) आहे. रात्री दोघांमध्ये वैयक्तीक कारणावरून भांडण झाल्यानंतर चिडलेल्या नितीवसनने पत्नी संध्याला लोखंडी रॉडने मारहाण केली. दोघांच्या भांडणाचा आवाज एकूण कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. मात्र, कोणीही दरवाजा उघडला नाही.

दरवाज उघडत नसल्याने कुटुंबीयांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तर त्यांना नववधू रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली. नितीवसन घटनेनंतर घरातून पळून गेला होता. मात्र, घराजवळच एका झाडाला त्याने फाशी घेतल्याचे आढळून आले.

कुट्टूर पोलिसांनी नवविवाहीत जोडप्याचे मृतदेह पोन्नीरी येथील रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलविले आहे. दोघांमध्ये भांडण कशावरून झाले असावे याचा शोध पोलीस घेत आहेत. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने दोघांनी ठराविक नातेवाईकांच्या उपस्थितीत लग्न केले होते. मात्र, लग्नाची पहिली रात्र दोघांची शेवटची रात्र ठरली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.