नवी दिल्ली - तीस हजारी न्यायालयाबाहेर झालेले प्रकरण ताजे असतानाच, आज (सोमवार) कडकडडूमा न्यायालयाबाहेरही पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली आहे.
शनिवारी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयामध्ये पोलीस आणि वकील यांच्यात झालेल्या वादाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांच्या गोळीबारानंतर संतप्त वकिलांनी पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून वाहने पेटवून दिल्याची घटना घडली होती. यामध्ये 20 हून अधिक पोलीस जखमी झाले होते. पोलिसांनी केल्या गोळीबारामध्ये सुरेंद्र वर्मा नावाच्या वकिलाला गोळी लागली होती.
या प्रकरणामुळे आज सकाळपासून कडकडडूमा न्यायालयाबाहेर थांबलेले वकील ना अन्य वकिलांना न्यायालयात जाऊ देत होते, ना पोलिसांना. त्यातच एका पोलिसाला वकिलांनी न्यायालयात जाण्यापासून अडवल्याने, त्यांच्यात बाचाबाची झाली. याचेच रुपांतर पुढे हाणामारीमध्ये झाले, आणि जमलेल्या वकीलांनी मिळून दोन पोलिसांना मारहाण केली.
हेही वाचा : तीस हजारी न्यायालयातील हिंसाचाराची न्यायालयीन चौकशी, 6 आठवड्यात अहवाल जमा करण्याचे आदेश