तिरुमला - भारतातील प्रमुख मोठ्या देवस्थानांपैकी एक असलेले बालाजी मंदिर पुन्हा भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आले आहे. मागील ७० दिवसाहून अधिक काळानंतर हे मंदिर भक्तासाठी खुले करण्यात आले आहे. पण भक्तांना दर्शनासाठी काही अटींचे पालन करावे लागणार आहेत.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, बालाजी मंदिर खुले करण्यात आले आहे. यात वृद्ध आणि लहान मुलांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिरात जास्त गर्दी होऊ नये म्हणून, मोजक्याच भक्तांना दर्शनासाठी सोडण्यात येणार आहे.
तिरुपती देवस्थानम मंदिर, बंगळुरुचे सचिव के. टी. रामाराजू यांनी सांगितले की, मंदिरात प्रवेश देताना भक्तांना सॅनिटायझर दिले जाईल. तसेच त्यांच्या शरीराचे तापमान तपासूनच मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.'
दरम्यान, देशात कोरोना विषाणू बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून १ मेपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत चार पट वाढ झाली असून मृतांच्या संख्येतही तीन पट वाढ झाल्याचे दिसत आहे. सद्य घडीला देशात २ लाख ५६ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. तर ७ हजार १३५ लोकांचा यात मृत्यू झाला आहे. दुसरीकडे केंद्र सरकारने अनलॉक-१ जाहीर करत सर्व व्यवहार सुरळीत करण्याच्या उद्देशाने प्रयत्न सुरू केले आहेत.
हेही वाचा - जम्मू-काश्मीर; शोपीयानमध्ये सुरक्षा दलाने केला 4 दहशतवाद्यांचा खात्मा
हेही वाचा - श्रीकृष्णाबाबत अपशब्द वापरणाऱ्या प्रवचनकार मोरारी बापूंविरोधात गुन्हा दाखल