नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन सुमारे ३२ लाखांचे सोने जप्त करण्यात आले. या सोन्याची तस्करी करणाऱ्या तीन जणांना कस्टम अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कस्टम अधिकाऱ्यांनी तीन जणांना सुमारे ५८० ग्रॅम सोन्याच्या बिस्किटांसह पकडले. यासंदर्भात चौकशी करण्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आहे. या सोन्याची एकूण किंमत सुमारे ३२ लाख रुपये असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
तसेच, यापूर्वी दुबईहून आलेल्या दोघांकडून सोन्याची पेस्ट जप्त करण्यात आली. या दोघांकडून जप्त करण्यात आलेल्या सोन्याची एकूण किंमत सुमारे ३४ लाख ५० हजार होती.