ETV Bharat / bharat

...तर या देशाचे नाव जगाच्या नकाशातून मिटेल, उन्नाव पीडितेच्या भावाची उद्विग्न प्रतिक्रिया - unnav rape victim

मला काहीही बोलायचे नाही. माझी बहीण आता आमच्यात नाही. त्या पाचही जणांना देहदंड व्हावा, यापेक्षा कमी काही नाही, असे वक्तव्य पीडितेच्या भावाने केले.

delhi
उन्नाव पीडितेचा भाऊ
author img

By

Published : Dec 7, 2019, 1:41 PM IST

नवी दिल्ली - त्या पाच जणांना देहदंडच मिळायला हवा. त्यापेक्षा कमी काही नाही, अशी भावना उन्नाव पीडितेच्या भावाने माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. शुक्रवारी रात्री पीडितेने सफदरजंग रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर पीडितेच्या कुटुंबीयांनी न्यायाची अपेक्षा केली आहे.

उन्नाव पीडितेच्या भावाने भावना व्यक्त केली

मला काहीही बोलायचे नाही. माझी बहीण आता आमच्यात नाही. त्या पाचही जणांना देहदंड व्हावा, यापेक्षा कमी काही नाही. असे वक्तव्य पीडितेच्या भावाने केले. देशात अत्याचाराच्या घटना अशाच रितीने होत राहिल्या तर या देशाला कुणी वाचवू शकणार नाही. या देशाचे खंडर होईल. जगाच्या नकाशातून देशाचे नाव मिटले जाईल, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पीडितेच्या भावाने दिली.

हेही वाचा - पोलिसांवर हल्ला केल्यानं आरोपींना गोळ्या घातल्या, हैदराबाद पोलिसांची पत्रकार परिषद

पीडितेच्या कुटुंबीयांना आधीपासून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यांचे दुकान जाळून टाकण्याची धमकी दिली जात आहे. अशी माहिती कुटुंबातील सदस्यांनी दिली. परंतु, गुरुवारी न्यायालयात सुनावणीसाठी जात असताना पाच जणांनी पीडितेवर हल्ला केला. रॉकेल टाकून तिला पेटवले. यात तिचा मृत्यू झाला आहे. मृतदेह उन्नाव येथील राहत्या घरी आणण्यात आला आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.