ETV Bharat / bharat

'सुसंस्कृत' चोर ! 65 हजार रुपयांची चोरी केल्यानंतर चिठ्ठी लिहून मागितली माफी - उसिलमपट्टी-मदुरई मदुराई सुपरमार्केट चोरी

तामिळनाडूमधील मदुराई येथे एका चोराने दोन कम्प्युटर, एक टीव्ही आणि 5 हजार रुपयांची रोकड असा सुमारे 65 हजार रुपयांची चोरी करून चक्क मालकाची माफी मागितली आहे.

चोराने चीठ्ठी लिहून मागितली माफी
चोराने चीठ्ठी लिहून मागितली माफी
author img

By

Published : Oct 11, 2020, 4:26 PM IST

चेन्नई - सध्या कोरोनाचा काळ सुरू असून अनेकांना आपला रोजगार गमवावा लागला आहे. हातचा रोजगार गेल्याने अनेक जण अडचणीत सापडले आहेत. कोरोना काळातच चोरीच्या घटनाही वाढल्या आहेत. तामिळनाडूमधील मदुराई येथे एका चोराने दोन कम्प्युटर, एक टीव्ही आणि 5 हजार रुपयांची रोकड असा सुमारे 65 हजार रुपयांची चोरी करून चक्क मालकाची माफी मागितली आहे.

तामिळनाडूच्या उसिलमपट्टी-मदुरई महामार्गावर एक सुपरमार्केट आहे. दुकान मालक रात्री दुकान बंद करून घरी गेले आणि गुरुवारी सकाळी त्यांनी सवयीप्रमाणे सुपरमार्केट उघडले. यावेळी त्यांना दुकानातील सामान अस्ताव्यस्त पडले असून चोरी झाल्याचे लक्षात आले. यानंतर लागलीच त्यांनी पोलिसांना चोरीबाबत माहिती दिली. मात्र, याच दरम्यान त्यांना चोराने त्यांच्यासाठी लिहिलेली माफीची चिठ्ठी मिळाली.

सॉरी..मला माफ करा, मी चोरी करतोय.

सॉरी..मला माफ करा, मी चोरी करतोय. मला भूक लागली होती. या चोरीमुळे तुमच्या एका दिवसाच्या कमाईचं नुकसान झाले आहे. मात्र, माझा तीन महिन्यांचा खर्च यातून निघणार आहे. तथापि, पोलिसांनी याप्रकरणी कलम 457 आणि 380 अंतर्गत तक्रार दाखल केली आहे. तसेच पोलिसांनी फिंगर प्रिंट्सच्या आधारे चोराचा शोध घेणे सुरू केले आहे.

यापूर्वीही महाराष्ट्रातील चंद्रपूरमध्ये अशीच एक घटना घडली होती. पैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला होता. या घटनेतून गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.