दिसपूर - आसाममधील धुबरी जिल्हा हे बेकायदेशीर कामाचे मुख्य तळ म्हणून ओळखले जात आहे. भारतातील या भागाला लागून बांग्लादेशची सीमा आहे. परंतु विशेष म्हणजे येथील 38 किमीवर सीमा निश्चित करण्यात आलेली नाही. यामुळे या भागात अवैध स्थलांतर, गायींची तस्करीसाठी या अनिश्चित सीमेचा वापर मोठ्याप्रमाणात केला जात आहे.
धुबरी जिल्ह्यात यावर्षी 62 गुन्हे नोंदविण्यात आले असून तीन अवैध स्थलांतरितांना अटक करण्यात आली आहे. या भागातील अशी व्यक्ती आहे ज्याच्यावर 62 गुन्हे नोंदविलेले होते. दक्षिण सल्मारा जिल्ह्यात 40 गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून 1109 गायींना तस्करी दरम्यान वाचवण्यात आले आहे. तर 76 लोकांना अटक करण्यात आली आहे.
आसाममध्ये या भागाची सुरक्षा बीएनबीएसएफ (BNBSF) द्वारे पाहिली जाते. या सीमेवर सुरक्षेसाठी BNBSF ची ६ वी तुकडी तैनात आहे.
- भारत-बांगलादेश सीमा ठरत आहे गुन्हेगारांचे घर
- भारत-बांगलादेश सीमेवर गुन्हेगार, तस्करांच्या मुक्त वावर
- भारत-बांगलादेश सीमा गुन्हे करण्यांसाठी स्वर्ग ठरत आहे
- भारत व बांगलादेश दरम्यान 38 किमीवर कोणतीही सीमा नाही
- सीमासुरक्षेसाठी BNBSF ची ६ वी तुकडी तैनात आहे