श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग परिसरात आज सकाळपासून सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटक पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. हे दहशतवादी लष्कर-ए-तोयबा या संघटनेचे असल्याची माहिती समोर आली आहे.
-
#UPDATE 2 LeT terrorists killed. Incriminating material, including arms & ammunition, recovered. Search is going on. More details awaited: Kashmir Zone Police https://t.co/bvB2MLSnWl
— ANI (@ANI) September 25, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#UPDATE 2 LeT terrorists killed. Incriminating material, including arms & ammunition, recovered. Search is going on. More details awaited: Kashmir Zone Police https://t.co/bvB2MLSnWl
— ANI (@ANI) September 25, 2020#UPDATE 2 LeT terrorists killed. Incriminating material, including arms & ammunition, recovered. Search is going on. More details awaited: Kashmir Zone Police https://t.co/bvB2MLSnWl
— ANI (@ANI) September 25, 2020
यासोबतच, आज सकाळीच दक्षिण काश्मीरमधील एका सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. सुदैवाने या गोळीबारात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. यानंतर मिनी सेक्रेटरिएट परिसराला सुरक्षा दलांनी घेराव घातला आहे.
यापूर्वी गुरुवारीही अवंतीपूरा आणि पुलवामामध्येही दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर दुसरीकडे, बडगाममध्ये एका सीआरपीएफ जवानाला वीरमरण प्राप्त झाले होते. काश्मीरच्या पुलवामा, बडगाम, अनंतनाग आणि मिनी सेक्रेटरिएट परिसरात मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांसाठी शोधमोहीम राबवण्यात येत आहे.
हेही वाचा : भारत आणि चीनचे 'अभूतपूर्व' परिस्थितीतून मार्गक्रमण