ETV Bharat / bharat

काश्मीरात दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्थ; शस्त्रसाठा जप्त

author img

By

Published : Feb 14, 2020, 12:21 PM IST

जिल्ह्यातील कुनियन भागात सुरक्षा दलांनी शोध मोहिम राबवली होती. यावेळी दहशतवाद्यांचा अ़ड्डा उद्ध्वस्थ करण्यात आला.

Terrorist hideout
दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्थ

श्रीनगर - जम्मू काश्मीरात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचा अड्डा उद्ध्वस्थ केला आहे. या ठिकाणाहून पोलिसांनी शस्त्रात्रे आणि दारूगोळा जप्त केला आहे. गुरुवारी पुंछ जिल्ह्यामध्ये पोलिसांनी केलेल्या या कारवाईत विशेष पथकानेही सहभाग घेतला होता.

जिल्ह्यातील कुनियन भागात सुरक्षा दलांनी शोध मोहिम राबवली होती. पुंछचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक रमेश अनग्रल म्हणाले, स्पेशल ऑपरेशन ग्रुप आणि राष्ट्रीय रायफल दलाच्या जवानांनी कारवाईत सहभाग घेतला होता. शोधमोहिमेदरम्यान दहशतवाद्यांचा अ़ड्डा उद्ध्वस्थ करण्यात आला. एक AK-४७ रायफल, चीनी बनावटीचे पिस्तूल आणि काही मॅग्झिन जप्त करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पुंछ पोलीस पुढील तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर पोलिसांनी बडगाम जिल्ह्यातून दहशतवाद्यांच्या ५ हस्तकांना अटक केली होती. 'इस्लामिक स्टेट इन जम्मू अ‌ॅड काश्मीर' या संघटनेच्या सदस्यांना हे हस्तक मदत करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या प्रकरणीही तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.