ETV Bharat / bharat

हुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी दिला मदतीचा धनादेश... - केसीआर संतोष बाबू कुटुंबीय भेट

कर्नल संतोष बाबू यांना वीरमरण आल्याची माहिती मिळताच, केसीआर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. याचा धनादेश देण्यासाठी आज (सोमवार) ते स्वतः संतोष यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी चार कोटी रुपयांचा धनादेश संतोष यांच्या पत्नी संतोषीकडे सुपूर्द केला. तर, एक कोटी रुपयांचा धनादेश संतोष यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केला. यावेळी, हे पैसे आपल्या नातीसाठी डिपॉझिट करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

Telangana CM hands over cheques, job letter to martyred Colonel's kin
हुतात्मा कर्नल संतोष बाबूंच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिला मदतीचा धनादेश..
author img

By

Published : Jun 22, 2020, 7:48 PM IST

हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव (केसीआर) यांनी हुतात्मा कर्नल बी. संतोष बाबू यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. तसेच, मदत म्हणून पाच कोटी रुपयांचा धनादेशही त्यांनी कुटुंबीयांच्या स्वाधीन केला. कर्नल संतोष बाबू यांना भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या झटापटीदरम्यान वीरमरण आले होते. या झटापटीत कर्नल बाबूंसोबत देशाचे २० जवान हुतात्मा झाले होते.

कर्नल संतोष बाबू यांना वीरमरण आल्याची माहिती मिळताच, केसीआर यांनी त्यांच्या कुटुंबीयांना पाच कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. याचा धनादेश देण्यासाठी आज (सोमवार) ते स्वतः संतोष यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांनी चार कोटी रुपयांचा धनादेश संतोष यांच्या पत्नी संतोषीकडे सुपूर्द केला. तर, एक कोटी रुपयांचा धनादेश संतोष यांच्या आई-वडिलांकडे सुपूर्द केला. यावेळी, हे पैसे आपल्या नातीसाठी डिपॉझिट करण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

यासोबतच, मुख्यमंत्र्यांनी संतोषी यांना ग्रुप-१ पदावरील नोकरी, आणि घर देण्याची घोषणा केली होती. या नोकरीचे अपॉइन्मेंट लेटर, आणि घराची कागदपत्रेही त्यांनी संतोषी यांच्याकडे सुपूर्द केली. यावेळी त्यांनी संतोष यांना श्रद्धांजली वाहत, कुटुंबीयांचे सांत्वन केले. तसेच, यापुढेही कोणती मदत लागल्यास आपल्याशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी संतोष यांच्या कुटुंबीयांना केले आहे. यावेळी त्यांच्यासोबत जी. जगदीश रेड्डी, वेमुला प्रशांत रेड्डी, आणि मुख्य सचिव सोमेश कुमार हेदेखील होते.

जगदीश रेड्डी यांनी सांगितले, की शहरातील एका ट्रॅफिक जंक्शनवर संतोष बाबूंचा पुतळा उभारण्यात येणार असून, त्या परिसराला त्यांचे नाव देण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. यासोबतच, केसीआर यांनी सीमेवर झटापटीत हुतात्मा झालेल्या बाकी जवानांच्या कुटुंबीयांनाही प्रत्येकी दहा लाख रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे.

हेही वाचा : 'तुमचे सैनिक झटापटीमध्येही जिंकू शकत नाहीत, मग युद्धाचा विचारच सोडा'; चीनी ड्रॅगनचे फुत्कार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.