ETV Bharat / bharat

तेलंगाणा भाजप अध्यक्षांनी सोशल डिस्टन्सिंगचा उडवला फज्जा; पोलिसांनीही केले दुर्लक्ष

author img

By

Published : May 5, 2020, 10:35 AM IST

एका व्हिडिओमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. त्यात बांदी कुमार आणि त्यांचे कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसून येत आहे. या ठिकाणी पोलीसही होते, मात्र त्यांनी देखील सोशल डिस्टन्सिंगला बगल दिल्याचे दिसून आले आहे.

Bandi Sanjay Kumar
भाजप अध्यक्ष

रंगा रेड्डी (तेलंगाणा)- तेलंगाणाचे भाजप अध्यक्ष बांदी संजय कुमार यांनी आज सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. बांदी कुमार हे आपल्या कार्यकर्त्यांबरोबर जिल्ह्यातील कोहेडा गावातील एका फळबाजारात गेले होते. या फळ बाजाराला मुसळधार पावसामुळे नुकसान झाले होते. यावेळी फळ बाजाराचा आढावा घेताना सदर प्रकार घडला.

एका व्हिडिओमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला आहे. त्यात बांदी कुमार आणि त्यांचे कार्यकर्ते सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवताना दिसून येत आहे. या ठिकाणी पोलीसही होते, मात्र त्यांनी देखील सोशल डिस्टन्सिंगला बगल दिल्याचे दिसून आले आहे.

दरम्यान, आज तेलंगणात ३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. हे सर्व रुग्ण हैदराबाद येथील आहेत. त्यामुळे, राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या ही आतापर्यंत १०८५ इतकी झाली आहे.

हेही वाचा- दिल्ली हिंसाचार: अंकित शर्माच्या कुटुंबीयांना दिल्ली सरकार देणार १ कोटीची मदत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.