ETV Bharat / bharat

ही लढत नकली चौकीदार विरुद्ध असली चौकीदार; तेजबहादुर यांचा मोदींना टोला - Modi

तेजबहादुर यादव यांनी २०१७ मध्ये बीएसएफ जवानांच्या जेवणात त्रुटी असलेला एक व्हिडिओ समोर आणला होता. त्यावेळी यादव चर्चेत आले. मात्र, आता चक्क मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरत आहेत.

तेजबहादुर यादव
author img

By

Published : Mar 31, 2019, 6:07 PM IST

Updated : Mar 31, 2019, 7:33 PM IST

लखनौ - एकीकडे पंतप्रधान मोदी नकली चौकीदाराच्या रुपात निवडणूक लढवत आहेत. तर, दुसरीकडे खरा चौकीदार त्यांच्या विरुद्ध लढत आहे. त्यामुळे ही लढत आता बरोबरीच्या लोकांमध्ये होणार, असा टोला सशस्त्र सीमा बलातून (बीएसएफ) बडतर्फ करण्यात आलेल्या तेजबहादुर यादव यांनी मोदींवर मारला आहे. ते वाराणसी लोकसभा मतदार संघातून मोदींच्या विरोधात स्वतंत्र निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आज पत्रकारांशी बोलताना मोदींवर अनेक आरोप केले.

लोकसभा निवडणुकांना फारच कमी कालावधी उरलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या घडामोडींना उधाण आले आहे. तेजबहादुर यादव हेही लोकसभा निवडणूक लढवत आहेत. विशेष म्हणजे त्यांनी मोदी यांच्या विरोधात लढण्याचा निश्चय केला आहे. त्यामुळे स्वतंत्र उमेदवार म्हणून वाराणसीतून ते निवडणूक लढणार आहेत.

  • Tej Bahadur Yadav, Independent candidate from Varanasi Parliamentary Constituency: I will ask PM, 'you had made promises, what all did you do till date? Tell us.' It's an equal fight, on one side you have 'asli chowkidaar' and on the other you have 'nakli chowkidaar. pic.twitter.com/XIgSylCZRJ

    — ANI (@ANI) March 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मोदी यांनी अर्धसैनिक बलातील जवानांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांना शहीदांचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. मात्र, त्यांची ही घोषणाही फोल ठरली, असे तेजबहादूर यांनी म्हटले. अर्धसैनिक बलला पेन्शन देण्याचे वचनही मोदी यांनी दिले होते. मात्र, तेवढेही मोदी करू शकले नाहीत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

पहा तेजबहादुर यादव मोदींबद्दल काय म्हणाले

पंतप्रधान मोदींनी आत्तापर्यंत अनेक घोषणा केल्या. मात्र त्यापैकी त्यांनी किती पूर्ण केल्यात? असा सवालही यादव यांनी यावेळी उपस्थित केला. यादव यांनी २०१७ मध्ये बीएसएफ जवानांच्या जेवणात त्रुटी असलेला एक व्हिडिओ समोर आणला होता. त्यावेळी यादव चर्चेत आले. मात्र, आता चक्क मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढवत असल्यामुळे ते चर्चेचा विषय ठरत आहेत.

Intro:Body:

national News

Conclusion:
Last Updated : Mar 31, 2019, 7:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.